टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा आरक्षण नाकारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून सर्व पक्ष प्रमुखांची भेट घेऊन मीडियासमोर राजकारण विरहित मराठा आरक्षणा विषयी भूमिका स्पष्ट करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिनी मराठा आरक्षणाचे राजकारण विरहित मोठे आंदोलन उभा केले जाईल असे जाहीर केले.
आज मंगळवेढा येथील शिवालयात एक दिवसीय लक्षणीय उपोषण सुरू केले होते. याप्रसंगी नायब तहसिलदार बाळासाहेब मागाडे यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंतीचे माजी अध्यक्ष सिध्देश्वर आवताडे,विठ्ठल घुले,उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले,ज्ञानेश्वर कोंडुभैरी,पोपट पडवले, सतीश दत्तू, हर्षद डोरले,संभाजी घुले,शंभू नागणे, राहुल टाकणे, दीपक कसगावडे यांच्यासह असंख्य बांधव उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या याच राजकारणविरहित भूमिकेला अनुसरून 6 जूनला रायगडावरती ते मराठा आरक्षणाच्या आंदोलना विषयी ते जो काही निर्णय घेतील त्याला मंगळवेढ्यातील संपूर्ण मराठा समाजाचा पाठिंबा असेल व सर्वात मोठा उठाव मंगळवेढा शहरातून व ग्रामीण भागातून करण्यात येईल, यासाठीच आजचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज जरी ठराविक लोकांच्या उपस्थित हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले असले तरी 6 जून नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कोरोना वगैरे काहीही न बघता मोठ्या प्रमाणात आणि मंगळवेढा शहरातील सर्वच सकल मराठा समाज विचारात घेऊन मोठे आंदोलन केले जाईल याचीही प्रशासनाने नोंद घ्यावी.
मंगळवेढ्यातील मराठा समाजाला मराठा महासंघाची एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे मंगळवेढ्यातील अनेक ज्येष्ठ लोकांनी पूर्वीच्या काळी मराठा महासंघाच्या माध्यमातून खूप मोठा लढा उभा केला होता ज्याचा आजही सोलापूर जिल्ह्यात उल्लेख केला जातो. तसाच लढा ज्येष्ठ लोकांच्या मार्गदर्शनातून मंगळवेढा तालुक्यातुन मराठा आरक्षणासाठी हे उभा केला जाईल.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावातूनही आसाच राजकारण विरहीत लढा उभा करून एक दिवसीय उपोषण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या रायगड मराठा अंदोलनास पाठिंबा द्यावा असे जाहीर अव्हानही या ठिकाणी करण्यात आले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज