mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढ्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मंजुरी : आ.समाधान आवताडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 31, 2021
in मंगळवेढा, सोलापूर
समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंगळवेढा – पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उतर सोलापूर तालुक्यातील रस्त्यांसाठी १७२.६१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

ग्रामविकास मंत्रालयाच्या विभागाकडून या रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळायचे पत्र प्राप्त झाल्याची माहिती खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दिली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी ते येद्राव ते हुलजंती, शेळेवाडी ते गणेशवाडी- खुपसुंगी- जुनोनी – नंदेश्वर या १३ किलोमीटर रस्त्यांच्या कामास १० कोटींहून अधिक निधी मंजूर झाला आहे.

पंढरपूर तालुक्यातील वडाचीवाडी- वाखरी-कोर्टी, करकंब भोसे मधला मार्ग ते होळे, करकंब ते घोटी मार्गे तालुका हद्द, ओझेवाडी-सरकोली ते शंकरगाव या सुमारे ३० किलोमीटर रस्त्यांसाठी २१ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.

तसेच अक्कलकोट तालुक्यातील विविध रस्त्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून २१ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

अक्कलकोट तालुक्यातील ३० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांमध्ये नाविंदगी ते कल्लहिपरगे, नाविंदगी ते नागणसुर, नागणसुर ते हैद्रा, केगाव ते पानमंगरूळ, पानमंगरूळ ते कल्लहिपरगे या कामांना मंजुरी मिळाली आहे.

मोहोळ तालुक्यातील नरखेड ते अनगर, खवनी ते सारोळे – चिखली, अर्जुनसोंड ते सावळेश्वर, कुरुल ते पिंपरी, दादपूर ते पिरटाकळी अशा २९ किलोमीटरसाठी २५ कोटींचा निधी मंजूर आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची ते कोंडी-अकोलेकाटी, राष्ट्रीय महामार्ग ते कोंडी-कारंबा -मार्डी ते जिल्हा हद्द, बाणेगाव ते कारंबा -चिंचोळी एमआयडीसी अशा २२ किलोमीटरसाठी १० कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव ते कुंभारी, दहिटणे ते सिंदखेड, गंगेवाडीपासून कासेगाव, उळे, उळेवाडी, बक्षीहिप्परगा मार्गे मुळेगाव तांडा, कासेगाव ते वडजी, एनएच ६५ ते मुळेगाव मार्गे कुंभारी या रस्त्यांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी व केंद्रीय ग्रामविकास मंत्री तोमर यांचे आभार

ग्रामविकास विभागाने या कामांना दिलेल्या प्रशासकीय मंजुरीचे पत्र पाठवीत सोलापूरकरांना आनंदाची बातमी दिली. या कामी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे सोलापूरवासियांच्या वतीने आभार मानले. जिल्ह्यातील अत्यंत आवश्यक व त्रासदायक रस्त्यांच्या कामांना लवकरच सुरुवात होईल.- खा.जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार, सोलापूर

मंगळवेढा-पंढरपूरच्या विकासात भर

मंगळवेढा तालुक्यासाठी व पंढरपूर तालुका साठी विविध रस्त्यांच्या कामांना निधी मंजूर झाला असून त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे विकासात भर पडली आहे.- समाधान आवताडे,आमदार,मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

हुलजंतीत ‘कृष्णा महिला पतसंस्थेच्या’ नवीन शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा; १०० दिवसांच्या ठेवीवर १०% व्याजाची ‘शुभारंभ योजना’ लागू

August 24, 2026

शाळेत ‘तालिबानी’ कृत्य! शिक्षकाने लाकडी पट्टी अन् बुक्क्यांनी मुलाला तुडवले, २६ दिवसांनंतर अखेर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील घटना

August 24, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंना नार्वेकरांकडून ‘राजकीय बूस्टर डोस’; आवताडे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण

August 23, 2026
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

साखरेचा भाव वाढला, मग उसाचा का नाही? शेतकऱ्याच्या घामाला योग्य किंमत मिळावी; प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष राकेश पाटील यांचा खरमरीत सवाल

August 23, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

बळीराजाचे डोळे आभाळाकडे! सोलापूर जिल्ह्यात कधी पडणार चांगला पाऊस? पंजाबराव डखांनी दिली महत्वाची माहिती

August 25, 2026
Next Post
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

भगीरथ भालके,आ.आवताडे,सुभाष देशमुखांना दणका; राज्यातील २४ साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस

ताज्या बातम्या

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

प्रधानमंत्री आवास योजनेतून बाद ठरलेल्या पात्र लाभार्थ्यांना मोठी संधी; ‘या’ तारखेपूर्वी हमीपत्र सादर करण्याचे सभापती दीपाली ताड यांचे आवाहन

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सोलापूर जिल्ह्यातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी कडक आचारसंहिता लागू; शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकांना नोंदवही ठेवण्याचे आदेश

August 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बाबो..! कुत्र्याने कोंबडी पळवल्यावरून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी; चौघांवर गुन्हा; कोंबडीच्या मागे कुत्रे लागल्यावरून चौघांकडून मारहाण

August 25, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! बचत गट अन् भिशीच्या नावाखाली अडीच कोटींची फसवणूक, तिघांवर गुन्हा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

August 26, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास ‘या’ तारखेपासून उपोषण सुरू करणार

August 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा