टीम मंगळवेढा टाईम्स ।
प्रशिक्षणाचे मानधन मिळवून देण्यासाठी महिलेकडून दहा हजार रुपयांची स्वीकारल्याप्रकरणी मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील सरपंच आप्पासाहेब येसप्पा पाटील (वय ५७) , ग्रामसेवक श्रीकांत मधुकर ठेंगील (३८) व खासगी व्यक्ती अरबाज अखिल शेख (२१) या तिघांवर गुन्हा हजार दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एकाव्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दिली होती. त्या व्यक्तीने दोन वर्षांपूर्वी धर्मगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १४ व्या वित्त आयोगाकडून गावातील बचतगटाच्या महिलांसाठी ३० दिवसांचे प्रशिक्षण दिले होते.
यासाठी मानधन म्हणून त्यांना ९६ हजार रुपये मंजूर झाले होते. ते पैसे मंजूर करण्यासाठी तिघांनी मिळून २५ हजारांची लाच मागितली होती.
दहा हजार रुपये देण्याचे ठरले होते. ग्रामसेवक, सरपंच आणि शेख तिघांना यांना सोलापुरातील रामलाल चौकात मागितल्या प्रकरणी लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील , पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्यासह हवालदार सायबण्णा कोळी, पोलिसात शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी , श्रीराम घुगे , कोष्टी , प्रफुल जानराव , स्वप्नील सन्नके , श्याम सुरवसे या पथकाने केली.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज