टीम मंगळवेढा टाइम्स ।
मंगळवेढा नगरपालिका हद्दीतील नागरिकांना कोरोना लस मिळावी यासाठी आता शहरातील पाच केंद्रावर 45 वर्षांपुढील नागरिकांच्या नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध केल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी दिली आहे.
शहरातील नागरिकांना आता कोरोना लसीकरणा संदर्भात सर्व माहिती घर बसल्या मिळणार आहे.त्यासाठी नगरपालिकेच्या वतीने पाच केंद्र सुरू करण्यात आली आहेत.तिथे पहिले नाव नोंदणी करून घ्यावी लागणार आहे.
45 वर्षांपुढील नागरिकांनी ‘येथे’ नाव नोंदणी करावी
न.पा. शाळा क्र.1 गणेश बागेसमोरील, न.पा. शाळा क्र 2 न.पा. कार्यालया शेजारील, न.पा. शाळा क्र.3 शनिवार पेठ, न.पा.शाळा क्र.4 नागणेवाडी, न.पा. शाळा क्र.5 साठेनगर या पाच ठिकाणी सकाळी 8 ते 10 या वेळेत नाव नोंदणी करता येणार आहे.
नाव नोंदणीसाठी ‘हे’ कागदपत्रे बंधनकारक
नाव नोंदणीसाठी आधारकार्ड , पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र किंवा शासकिय ओळखपत्र व संपर्कासाठी फोन क्रमांक आवश्यक आहे. सदर शाळामध्ये 45 वर्षापुढील नागरिकांसाठी पहिला डोस व दुसरा डोस अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात येईल.
नोंदणी झाल्यानंतर सदर नोंदणीचे टोकन देण्यात येईल. लस उपलब्धतेनुसर मंगळवेढा नगरपरिषदेकडून नागरिकांना लसीकरणाची दिनांक व वेळ एसएमएस किंव्हा फोनद्वारे कळविण्यात येणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज