टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत असल्यामुळे सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 ते 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सुरू असलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरू असलेल्या अत्यावश्यक सेवा देखील 8 ते 15 पर्यंत बंद असतील.
या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरू राहतील अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. 8 मे रात्री 8 ते 15 मे सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.
काय सुरु, काय बंद ?
त्यामुळे किराणा दुकाने, भाजीपाला, फळविक्रेता आणि इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने देखील या आठवडाभरासाठी संपूर्णपणे बंद असतील.
मात्र नागरिकांना अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी सवलतीसाठी आज 7 मे शुक्रवार आणि 8 मे, शनिवारी परवानगी देण्यात आली आहे.
प्रशासनाने घोषित केलेल्या आदेशानुसार केवळ हॉस्पिटल, मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडित अस्थापनाच या काळात सुरू राहणार आहेत.
दरम्यान ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील हेच आदेश लागू राहतील अशी माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
दूध विक्री केवळ घरपोच करता येणार
तर दूध विक्री केवळ घरपोच करता येईल. तसेच लसीकरणसाठी जे नागरिक घराबाहेर पडतील त्यांच्याकडे नोंदणीचे मेसेज असणे गरजेचे असणार आहे.
नोंदणी केलेल्या दिवशीच आणि त्याच वेळेत लसीकरणसाठी घराबाहेर पडता येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली. तसेच मेडिकल आणि वैद्यकीय सेवेशी निगडीत असलेल्यांनी आपल्या सोबत ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक असेल अशी माहिती देखील तेजस्वी सातपुते यांनी दिली.






बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











