टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते या कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. पोलिस अधीक्षक सातपुते यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा पहिला डोस घेतला होता.
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मला कोरोनाचे निदान झाले आहे.मागील तीन-चार दिवसांत ते प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी कोविडच्या लक्षणांवर नजर ठेवून कोरोनाची योग्य खबरदारी घ्यावी असा मेसेज आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पाठविला आहे.
कोरोनाचे उपचार त्या घेत आहेत. तोवर पोलिस अधीक्षपदाचा पदभार अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्याकडे राहणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या निमित्ताने प्रशासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा सातत्याने लोकांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्क येतो.
I am diagnosed with COVID-19 today.
Those who came in direct or indirect contact in last 3-4 days may kindly keep watch for covid symptoms and take covid appropriate precautions.My charge will be with Addl SP,Solapur R.Wish to join soon.
Take care.
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) April 7, 2021
वारंवार बैठकांचे आयोजन करून नागरिकांना व त्यांच्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना कराव्या लागतात. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोनदा कोरोनावर मात करीत पुन्हा काम हाती घेतले आहे.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही कोरोनावर मात करून ड्यूटी जॉईन केली आहे. त्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनीही कोरोनावर मात केली. जिल्ह्यातील आमदार प्रशांत परिचारक, यशवंत माने, प्रणिती शिंदे यांनीदेखील कोरोनावर मात केली आहे.
आता आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राजन पाटील यांना कोरोनाची बाधा झाली असून ते उपचार घेत आहेत. दुर्दैवी घटना म्हणजे ज्येष्ठ माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्री, आमदारांनाही कोरोनाची बाधा होऊन ते बरे झाले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज