टीम मंगळवेढा टाईम्स ।
गेल्या अनेक वर्षांपासून मंगळवेढा तालुक्यातील 35 गावच्या पाण्याचा प्रश्न निवडणुकीत पुढे करून जनतेची दिशाभूल करण्याचे पाप आत्तापर्यंत करण्यात आले असल्याचा आरोप माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केला आहे. ते भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ भाळवणी गावात बोलत होते.
यावेळी विधानपरिषद आ.प्रशांत परिचारक,आ.रणजितसिंह मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,शशिकांत चव्हाण, गौरीशंकर बुरुकुल,मरवडे गावचे सरपंच नितीन घुले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,रयत क्रांतीचे दीपक भोसले,शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत,दीपक वाडदेकर आदीजन उपस्थित होते.
प्रा.ढोबळे पुढे बोलताना म्हणाले की, आत्तापर्यंत जनतेंनी अनेक लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत. पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांनी 35 गावचे राजकारण आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी केलेले आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणाऱ्या अशा उमेदवारास जनतेने यंदा घरी बसवले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 35 गावाला पाणी आणण्यासाठी समाधान आवताडे यांना यावेळी जनतेने संधी दिली पाहिजे.त्याचबरोबर मतदारसंघातील इतर प्रलंबित प्रश्न आणि आत्तापर्यंत विकासापासून कोसोदूर असलेली गावे यांचा विकास करण्यासाठी दि.17 एप्रिल रोजी कमळा समोरील बटन दाबून विकासरत्न समाधान आवताडे यांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सतीश शिंदे, राजेंद्र पोतदार, राजाराम कदम,राजाराम कालिबाग,श्रीकांत गणपाटील,पांडुरंग मासाळ, अमोल जाधव,महेश गायकवाड, सोमनाथ टोमके, गणेश पाटील, भारत मासाळ गुरुजी,दत्तात्रय बनसोडे,बजीरंग गायकवाड, आदीजन उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज