टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकिसाठी आज 11 जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिला आहे.
तर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माऊली हळनवर यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
पंढरपूर पोटनिवडणूकिसाठी 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत 8 अर्ज अवैध ठरले होते. वैध 30 अर्जापैकी 11 जणांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
तर 19 उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिद्धेश्वर अवताडे यांचा उमेदवारी अर्ज कायम राहिल्याने अनेकांना धक्का मानला जात आहे.
यामुळे भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. तर अपक्ष शैला गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांचे अर्ज राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत.
एकूणच उमेदवार अर्ज माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून राष्ट्रवादीचे भगीरथ भालके, भाजपचे समाधान अवताडे, अपक्ष सिद्धेश्वर अवताडे,अपक्ष शैला गोडसे, स्वाभिमानीचे सचिन पाटील यांच्यात लढत रंगणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज