mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उमेदवारीवरून प्रचंड अस्वस्थता! राष्ट्रवादीत वाढली धुसफुस; भाजपा बहुजन उमेदवाराच्या शोधात

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 23, 2021
in मंगळवेढा, राजकारण, सोलापूर
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकी दरम्यान प्रचार सभा,रॅली बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा ।

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील उमेदवार ठरविण्याचा निर्णय हा राष्ट्रवादीमध्ये एक मोठा पेच बनून राहिला आहे. भगीरथ भालके यांच्या समर्थनार्थ रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मोठे शक्तिप्रदर्शन झाले असले तरीही आतील बैठकांमध्ये अनेकांनी भगिरथदादांच्या विरोधात सूर लावला असल्याचे समजते.

भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडेल हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

युवराज पाटील,गणेश पाटील आणि यांच्यासारखे विठ्ठल परिवारातील काही शिलेदार हे आता पवारांचा आदेश मानून भगीरथ भालके यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील अशी स्थिती नाही. यापेक्षा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या अनुषंगाने काही गणिते मांडली जाऊ शकतात का ? यावर राष्ट्रवादीमध्ये विचार मंथन सुरू आहे.

कै.भालके यांच्या निधनानंतर तातडीने उमेदवार जाहीर करून जर सर्वशक्तीनिशी भगीरथदादांची उमेदवारी ठसवली असती तर ही वेळ आली नसती असाही सल्ला एकाने अजित पवार यांना दिला. आता उमेदवारी जाहीर करण्यासाठी बराच उशीर झाला असून ही धुसफूस मोठ्या प्रमाणात वाढली गेली आहे.

याही परिस्थितीची जाणीव अनेकांनी ना.पवार यांना करून दिली.त्यामुळे पक्षामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.अजित पवार यांनी दिल्लीला जाणे टाळले, तथापि जयंत पाटील यांनी रविवारी रात्री दिल्लीला जाऊन त्यांनी शरद पवार यांच्याकडे सर्व अहवाल दिला.

सोमवारी शरद पवार यांनी दिल्लीतील एका पत्रकार परिषदेत पंढरपूर पोटनिवडणुकीच्या संदर्भात उल्लेख केला. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर याबाबत किती गांभीर्याने विचार सुरू आहे ? याची साक्ष पटली.

येत्या दोन दिवसातच राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करावा लागणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पार्थ पवार यांचे नाव पुढे आले आहे. त्यांनादेखील उमेदवारी देऊन सर्व शक्तीनिशी राष्ट्रवादीच्या उमेदवारा पाठीमागे एक गठ्ठा उभा करावा यासाठी पर्याय काहींनी सुचविला असल्याचे समजते.(पंढरी संचार)

भाजप बहुजन चेहऱ्याच्या शोधात

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भगीरथ भालके यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. जर उमेदवारी बदलाचा निर्णय झाला असेल तर ती पार्थ पवार यांनाही दिली जाऊ शकते असा एक सूर व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष बहुजन उमेदवाराच्या शोधामध्ये असल्याचे खात्रीलायक वृत्त दैनिक ‘पंढरी संचार’ ने प्रसिध्द केले आहे. प्रशांत परिचारक हे आता निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत,

परंतु भाजपाच्या चिन्हापेक्षा अपक्ष उमेदवारी घेऊन त्याला भाजपने पुरस्कृत करावे याकडे त्यांचा कल असल्याचे समजते, परंतु भाजपाच्या अनेक नेतृत्वांना हे मान्य नाही. जर ही निवडणूक लढवली तर कमळाच्या चिन्हांवर लढवायची याकरिता त्यांचा आग्रह कायम असल्याचे सांगितले जाते.

काल प्रशांत परिचारक, समाधान आवताडे,डॉ बी.पी.रोंगे,अभिजीत पाटील यांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली. प्रशांत परिचारक यांनी कालपर्यंत निवडणुकीत उतरण्याबाबत कुठलेही संकेत दिले नव्हते. कार्यकर्त्यांकडून विचारणा होत असताना देखील त्यांनी पक्षाचा आदेश काय येतो बघू असेच भाषण केले होते.

परंतु काल प्रथमच निवड समितीसमोर त्यांनी आपली उमेदवारी सादर केली. विधान परिषदेचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढविण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे समजते , परंतु आजपर्यंतचा अनुभव पाहता प्रशांत परिचारक यांचे नेतृत्व लोकाभिमुख होऊ शकते का ? याबाबत भाजपातील काही नेतृत्वांना साशंकता आहे.

त्यापेक्षा एखादा बहुजन समाजाचा उमेदवार देऊन त्याच्या पाठीमागे परिचारक यांची शक्ती उभी करावी आणि त्यांच्या व्यवस्थेच्या जोरावर तो उमेदवार निवडून आणावा असाच विचार भाजपने मांडला असल्याचे दिसते.

देवेंद्र फडणवीस हेच अंतिम निर्णय घेणार

देवेंद्र फडणवीस हेच याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे समजते.दरम्यान चंद्रकांत पाटील आणि श्रीकांत भारतीय या दोघांची मते याबाबत निर्णायक ठरतील असे दिसते.जर परिचारक यांना उमेदवारी मिळणार नसेल तर त्यांना विधान परिषदेचा शब्द देऊन त्यांची पुढील सहा वर्षांकरिता निश्चिती करण्याचेही पक्षामध्ये ठरवले जाईल असेही एका नेत्याने ‘पंढरी संचार’शी बोलताना सांगितले.

तथापि राष्ट्रवादीच्या हातून जर ही जागा खेचून घ्यायची असेल तर त्यासाठी परिचारक यांच्या सुमारे ८० हजार मतांचा गठ्ठा भाजपा उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहणे गरजेचे आहे असे तर्क सध्या लढवले जात आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकभाजपमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघराष्ट्रवादी

संबंधित बातम्या

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 6, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 6, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
Next Post
पालकांनो मुलांचे भविष्य घडवा! मंगळवेढ्यात उद्या नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल

पालकांनो! मंगळवेढ्यात आज नवजात बालकांपासून ते १६ वर्षा पर्यंतच्या बालकांसाठी सुवर्णप्राशन शिबीर; फायदे वाचून थक्क व्हाल.

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 6, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 6, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 6, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..