टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक २३ मार्च २०२१ रोजी दुपारी १२.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय , मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
मंगळवेढा तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत तसेच मौजे सिध्दापूर येथील सन २०१८-१९ मधील संयुक्त वाळू ठेक्याच्या लिलावामधील एकूण सुमारे ६ हजार १४४.८४ ब्रास वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असून,
हा वाळू साठा मौजे सिध्दापूर येथे ४ हजार ६४४.८४ , माणनदी पात्रातील गट नं.८९ येथे ५०० ब्रास, मौजे ढवळस माणदीतील विहीरी शेजारी १ हजार ५०० ब्रास असा एकूण ४ हजार ६४४.८४ वाळू साठा ठेवण्यात आला आहे.
या ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे २ कोटी २७ लाख ३५ हजार ९ ०८ रुपये इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी.
तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार दिनांक २२ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी मंगळवेढा उपविभाग विभाग मंगळवेढा यांच्याकडे सादर करावेत असेही उपविभागीय अधिकारी भोसले यांनी सांगितले.
सदर लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम रोख अथवा डी.डी.व्दारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये २ हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे.
तसेच सर्वोत्तम बोलीची २५ टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.बोलीची उर्वरीत ७५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात ७ दिवसांच्या आत भरल्यानंतर स्वत : कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी.
लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तींनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत तसेच नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी भोसले यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज