टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे कुंपणासाठी शेतात उभे केलेले डांब आमच्या रानात आले असल्याची विचारणा करणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अविनाश आनंदा गवळी व अशोक आनंदा गवळी या दोघा भावाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ३६ वर्षीय महिला दि. ११ रोजी सकाळी ८.०० वा. गोणेवाडी येथील शेतातील वस्तीवर तारेचे कुंपण घेण्याकरीता डांब रोवले होते.
सदरचे डांब आमचे रानात आले आहेत असे म्हणून फिर्यादीच्या केल्याप्रकरणी मुलास वरील आरोपीने मारहाण करीत असताना फिर्यादीने त्याचा जाब विचारत असताना आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हातास धरून शरीरास झोंबाझोंबी करून मनास लज्जा वाटेल असे कृत्य करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
विवाहितेवर अत्याचार , एकाला जामीन मंजूर
बार्शी तालुक्यात एका गावच्या विवाहितेवर अत्याचार प्रकरणी आरोपी महेश उर्फ सोन्या बाळू रणसिंग याची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
२३ डिसेंबर २०२० रोजी पहाटे पिडीता प्रात : विधीसाठी गेल्यावर तिला पकडून मारहाण करून अत्याचार केल्याप्रकरणी महेश उर्फ सोन्या बाळूरणसिंग ( राखातगाव नंबर २ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला . त्यानंतर त्याला अटक झाली.
जामिनासाठी त्याने निखिल पाटील यांच्यामार्फत बार्शी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला त्याचा अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळले.
दुसऱ्या वेळी सदर जामीन अर्जाच्या युक्तिवाद यावेळी आरोपीचे वकील निखिल पाटील यांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला असून आरोपी हा विवाहित २२ वर्षाचा तरुण आहे. तपासकामी त्याची आवश्यकता नाही.
आरोपीस खोटेपणाने सदर केसमध्ये गुंतवण्यात आलेले आहे , असा युक्तिवाद करण्यात आला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी महेश उर्फ सोन्या बाळू रणसिंग यास जामिन मिळाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज