mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा तालुक्यातील 2 तर जिल्ह्यातील 66 संशयितांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; एका बाधिताचा मृत्यु

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 3, 2021
in सोलापूर, मंगळवेढा
सोलापूर कोरोना ब्रेकिंग! शनिवारी 153 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ गावातील 10 जणांचा मृत्यू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर ग्रामीण भागात मागील काही दिवसांमध्ये मंगळवारी प्रथमच रुग्ण संख्या वाढल्याचे समोर आले एक हजार 450 संशयितांच्या रिपोर्टमध्ये 66 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर करमाळा तालुक्‍यातील मिरगव्हाण येथील 73 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे होम क्वारंटाइनपेक्षा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनवर भर देण्याचे जाहीर करूनही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमध्ये एकही संशयित नसल्याचे समोर आले आहे.

सोलापूर शहरात मंगळवारी 794 संशयितांमध्ये 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 73 वर्षीय एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शहर- जिल्ह्यात काल एकाच दिवसात 93 रुग्ण आढळले असून मागील काही दिवसांतील ही मोठी वाढ आहे.

ग्रामीण भागातील 5 लाख 14 हजार 77 संशयितांची आतापर्यंत कोरोना टेस्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 40 हजार 637 कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एकूण रुग्णांपैकी 1 हजार 184 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून सध्या 497 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दररोज तीन हजार संशयितांची टेस्ट करण्याचे उद्दिष्ट असतानाही सरासरी दीड हजार संशयितांची कोरोना टेस्ट केली जात आहे.

सोलापूर जिल्ह्यात विना मास्क तथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे या पार्श्वभूमीवर बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्‍यांमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे.

मंगळवारी ‘या’ तालुक्यात वाढले रुग्ण

मंगळवेढा तालुक्यात दोन, अक्कलकोट तालुक्‍यात तीन, बार्शीत 12, करमाळा चार, माढा 19, माळशिरस नऊ, उत्तर सोलापुरात दोन, मोहोळ तालुक्‍यात चार, पंढरपूर तालुक्‍यात सात, सांगोला तालुक्‍यात तीन तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात एक रुग्ण वाढला आहे.

सोलापूर शहरात ‘या’ भागात आढळले रुग्ण

शिवगंगा कॉम्प्लेक्‍स (पश्‍चिम मंगळवार पेठ), बॅंक ऑफ कॉलनी (जुळे सोलापूर), द्वारका नगर, गांधी नगर (दक्षिण सदर बझार), कर्णिक नगर, एकता नगर, जुना पुना नाका, शाहीर वस्ती, जुना बर्फ कारखान्याजवळ (रेल्वे लाईन), कुर्बान हुसेन नगर (गुरुनानक चौक) आणि शेखर वस्ती (देगाव),

वसंत विहार, स्वामी विवेकानंद नगर, मेहता रेसिडेन्सी, कोटणीस नगर (विजयपूर रोड), एसआरपीएफ कॅम्प (सोरेगाव), रेल्वे लाईन (जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ), आकाशवाणी केंद्राजवळ, भावना अपार्टमेंट (रेल्वे लाईन्स), जुनी मिल चाळ (मुरारजी पेठ), शुक्रवार पेठ, शिवम अपार्टमेंट (सम्राट चौक) येथे नवे रुग्ण आढळले आहेत.

शहरातील एक लाख 76 हजार 496 संशयितांमध्ये आतापर्यंत 12 हजार 483 रुग्ण आढळले असून त्यातील 662 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात होम क्‍वारंटाईनमध्ये 94 तर इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये 36 आणि होम आयसोलेशनमध्ये पाचजण आहेत.

कोरोनाचे उपचार घेणारे तालुकानिहाय रुग्ण

मंगळवेढा 11,पंढरपूर 53,सांगोला 24,माळशिरस 105, अक्कलकोट 18, बार्शी 62, करमाळा 68, माढा 66, उत्तर सोलापूर 16, मोहोळ 33, दक्षिण सोलापूर 41 अशाप्रकारे जिल्ह्यातील 11 तालुक्‍यांमध्ये सध्या एकूण 497 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोनामंगळवेढासोलापूर कोरोना

संबंधित बातम्या

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा

September 5, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
Next Post
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

सोने खरेदीसाठी सज्ज व्हा! इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं; पाहा काय आहे दर

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..