टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-सोलापूर महामार्गावरील तरटगाव- शिंगोली दरम्यान मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील पंपावरील सव्वा लाखाच्या डिझेल चोरीच्या घटने पाठोपाठच तरटगाव (ता. मोहोळ) येथील शहा हंसराज जीवन या पपंपावरून दोन लाख 92 हजार 390 रुपये किमतीचे सुमारे तीन हजार पाचशे लिटर डिझेल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री एक ते शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
या घटनेच्या एक दिवस अगोदरच याच मार्गावरील ब्रह्मपुरी येथील शिवकृपा पेट्रोल पंपावरून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सुमारे दीड हजार लिटर डिझेल चोरीची घटना घडली आहे.महामार्गावरील पंपावर डिझेल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पंप चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, तरटगाव येथील घटनेची मिळालेली माहिती अशी, की या पेट्रोल पंपावर श्रीकांत मल्हारी मोटे (रा. शिंगोली) व मधुकर सोपान मोटे (रा. कामती खुर्द) हे कामगार कामावर होते.
डिझेल पंपाचे टाकीमध्ये किती डिझेल आहे हे पाहण्यासाठी तपासणीचे साहित्य (डीपी रॉड) घेऊन ते कामगार टाकीजवळ आले असता डिझेल टाकीला लावलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले.
वेगळी शंका आल्याने त्यांनी तपासणीचे डीपी रॉड टाकीमध्ये टाकून पाहिले असता सुमारे तीन हजार पाचशे लिटर डिझेल कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी पंप व्यवस्थापकांना याबाबतची माहिती दिली.
या घटनेची फिर्याद गायकवाड यांनी कामती पोलिसांत दिली असून तपास कामती पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार बबन माने हे करीत आहेत.
मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर दोन दिवसांत एकाच पद्धतीने झालेल्या डिझेल चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज