टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथील ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये दिलेले दाखले हे बोगस असून सदर दाखल्यावरील स्वाक्षरी तुमची असल्याने दाखले सादर केलेल्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे लेखी कळवूनही कार्यवाही न केल्याने मुढवी येथील ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले यांना कारणे दाखवा नोटीस गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी बजावली आहे.
भोसे येथील ग्रामपंचायत निवडणूकीत नामनिर्दे शन पत्रे भरताना उमेदवारांनी दाखले जोडले होते. यावेळी नामनिर्देशन पत्राची छाननी करताना दि.३१ डिसेंबर रोजी ठेकेदार असलेबाबतचे व शौचालय नसल्याबाबतचे दाखले जोडले होते.
ते दाखले बनावट आहेत किंवा कसे याबाबत विचारणा केली होती.या दाखल्यावर प्रभारी ग्रामसेवक म्हणून दत्तात्रय इंगोले यांचे नाव असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अदयापपर्यंत त्या ग्रामसेवकाने कारणे कुठलीच कार्यवाही न केल्याचे दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करून निवडणूक कामकाजामध्ये तुम्ही टाळाटाळ व विलंब करून निवडणूक आयोगाच्या आदेशाचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत तुम्हास का जबाबदार धरण्यात येवू नये याचा खुलासा नोटीस मिळताच दोन दिवसात करावा असे दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज