टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील जय भवानी कॉलनी शनिवार पेठ येथील एका व्यक्तीने कापडाच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना बुधवारी रोजी सकाळी सात वाजता घडली. दिलीप नागेश जाधव (वय.३८) असे मृताचे नाव आहे.
याबाबत राहुल उद्धव जाधव (वय २५) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली. यातील मृत दिलीप जाधव यांनी स्वतःच्या राहत्या घरातील स्लॅबच्या छताच्या लोखंडी हुकास कपड्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिलीप जाधव यास दारूचे व्यसन होते.दारूच्या नशेत त्याने गळफास घेतल्याची खबर चुलत भाऊ राहुल जाधव याने पोलिसांत दिली आहे.
त्याची नोंद अकस्मात मृत म्हणून झाली आहे. पोलीस हवालदार कोळी अधिक तपास करीत आहेत.
रिक्षात विसरलेले दागिने परत मिळाले
सीसीटीव्ही कॅमेरा फोनद्वारे शोध घेऊन रिक्षात विसरलेले पावणेदोन लाखांचे दागिने परत मिळविण्यात यश आले असून , गुन्हे शाखेच्या या कामगिरीने संबंधितांनी समाधान व्यक्त केले.
दीप्ती श्रीनिवास जाजू (वय.३४) या आई व मुलासह दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास सराफ बाजारात सोने खरेदीसाठी गेल्या होत्या.
त्यांनी एक लाख ७३ हजार ३४ ९ रुपये किमतीचे तीन तोळे सोने खरेदी केले . रिक्षा ( एमएच- १३ / सीटी -७१७७ ) मध्ये बसून त्या घरी गेल्या . रिक्षातून उतरल्या.
मात्र पर्स विसरल्या व तशाच गेल्या. घरी गेल्यानंतर पर्स रिक्षात विसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी इतस्त्र शोध घेतला ; मात्र रिक्षा कुठेही मिळाली नाही.
या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून त्यातून रिक्षाचा शोध लावला. रिक्षाचालकाचा शोध घेऊन चौकशी केली असता त्याने प्रवाशांनी सोने विसरले होते असे सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज