टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत दोन अध्यक्ष निवडले गेल्याने मोठा पेच निर्माण झाला होता मात्र मंडळाचे माजी अध्यक्ष तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी निवडले गेलेले दोघेही अध्यक्षपदी कायम ठेवून शिवजयंती उत्सव अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करण्याची ग्वाही देण्यात आली.
दि.१७ जानेवारी रोजी गणेश बाग येथे बैठक संपन्न झाली . यात अध्यक्ष पदी प्रशांत गायकवाड व ज्ञानेश्वर कोंडुभैरी ही दोन नावे अध्यक्ष म्हणून निवडल्याने पेच निर्माण झाला होता.
यावर तोडगा काढावा अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत होती. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढयाचा शिवजन्मोत्सव सोहळा एक आदर्श शिवजन्मोत्सव म्हणून ओळखला जातो.
मात्र तो यावर्षी दोन अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक , शिस्तबद्ध आणि एकोप्याने साजरा करण्याचे ठरले.
यावेळी नूतन अध्यक्ष प्रशांत गायकवाड व ज्ञानेश्वर कोंडुभैरी यांचा सिद्धेश्वर आवताडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी, प्रा.विनायक कलुबर्मे, राहुल वाकडे, अविराज आवताडे, प्रवीण भोसले, उमेश आवताडे, संभाजी घुले, अनिल मुदगूल, चंद्रकांत काकडे, परमेश्वर पाटील, प्रा.धनाजी गवळी, शरद गोसडे आदी उपस्थित होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9970 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9970 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज