टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार केल्याने राजकारण तापले होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जात आहे.
तर महाविकास आघाडीकडून मुंडेंच्या बाजूने सावध भूमिका घेतली गेली. आता धनंजय मुंडेवरील कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
नेते धनंजय मुंडे यांच्यावर असलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आपला मुळीच विश्वास नाही. या प्रकरणी चौकशी होऊ द्या. सत्य बाहेर येऊ द्या.
धनंजय मुंडे दोषी आढळले तर कारवाई करण्याची जबाबदारी आमची आहे, असे शरद पवार यांनी येथे स्पष्ट केले.
‘काही जणांना बिनबुडाचे आणि निराधार आरोप करण्याचा व्यवसाय बनलेला आहे. या प्रकरणाची वाटल्यास चौकशी होऊ द्या. सत्य काय ते बाहेर येऊ द्या. मुंडे हे दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही जबाबदार आहोत, असं पवार यांनी सांगितले.
संसदेच्या संरक्षण समितीचे सदस्य म्हणून शरद पवार सध्या गोवा दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज