टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. त्याठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत होणे बाकी होते.
त्यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने १ महिन्याच्या आत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेऊन सरंपच उपसरपंचदाच्या निवडी कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण येत्या २७ जानेवारी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश गेल्या १८ जानेवारी रोजी दिले आहेत. ग्रामविकास विभागाच्या १८ डिसेंबरच्या पत्रानुसार सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम व सरपंच आणि उपसरंपचपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निकाल लागल्यापासून ३० दिवसांच्या आत ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत.
त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत येत्या २७ जानेवारी रोजी घेण्यात यावे , असा उल्लेख यामध्ये करण्यात घेण्याच्या सूचना आला आहे.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील निवडणुका पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम येत्या २७ जानेवारी रोजी ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर सरपंच आणि उपसरपंचपदाची निवड होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज