टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन पत्रकार प्रमोद बिनवडे यांच्या हस्ते पूजा करुन उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रमोद बिनवडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाबाई भोसले या देखील महाराष्ट्रासाठी तितक्याच शिवरायां इतक्याच आदरणीय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यापासून ते जहागिरीचा कारभार सांभाळण्याच्या संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांनी एकटीने उत्तमप्रकारे सांभाळल्या होत्या. त्यांच्या कणखर स्वभावाचे शिवरायांवरही संस्कार झाले.
तर १२ जानेवारी १८६३ कलकत्ता येथे एक तेजस्वी बालक जन्मला. त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी होता. जणू काही चेहऱ्यावरून तेज ओसंडून जात आहे. असेच बघणारऱ्यांना वाटले. या तेजस्वी बालकाच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी.
विश्वनाथ दत्त कलकत्त्यातील एक प्रसिद्ध वकील होते. त्यांनी वकील व्यवसायात खूप नाव मिळविले होते. पैसाही चांगला मिळविला होता ते स्वभावाने सदाचारी, पत्नी भुवनेश्वरी या समाधानी व धार्मिक होत्या. त्यामुळे त्यांचा संसार सुखासामाधानीच होता.
तेजस्वी बालकाचे बारसे मोठ्या थाटामाटातच झाले. व त्याचे नाव ठेवले नरेंद्र ! हा नरेंद्र पुढे स्वामी विवेकानंद म्हणून जग प्रसिद्ध झाला.
प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयातील प्रत्येक बालकांना राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्यातील प्रेरणाप्रमाणे मुलांना घडविण्याचे कार्य प्रायमातील सर्व शिक्षिका करत असतात हे कौतुकास्पद आहे.
सध्या कोरोनाचे सावट संपूर्ण जगभर परसल्यामुळे शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद असताना देखील प्रायमा संस्थेत राष्ट्रीय सत्पुरुषांची जयंती, पुण्यतिथी नित्याने चालू असल्याचे पाहून समाधान वाटले. आज प्रायमा मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने येण्याचा योग आला.
प्रायमा मधील संपूर्ण वर्ग परिसरातील स्वच्छता आणि फुल झाडे, लहान मुलांना आवडतील अशी व्हरांडयात काढलेली रंगीत विविध प्राणी, पक्षी, सण असणारी माहिती खूपच सुंदर दिसत होती. याशिवाय प्रायमा एक्सप्रेस या नावाने काढलेली रेल्वे इंजिन व त्यामध्ये बसलेली मुले पाहून मन प्रसन्न होते.
प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार यांनी पत्रकार प्रमोद बिनवडे यांना गुलाब पुष्प व श्रीफळ देवून सत्कार केला तर कार्यक्रमाचे आभार गजानन कसगावडे मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वदीप कुंभार, प्रायमामधील मदतनीस शिला पलंगे, सुजाता मुदगुल यांनी परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज