mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला आला सोन्याचा भाव, शेतकरी ‘या’ खतावरच भर देत आहेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 28, 2020
in आरोग्य
शेतकऱ्यांनो! मंगळवेढ्यातील ‘या’ कृषी सेवा केंद्रांचा परवाना निलंबित; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची कारवाई

टीम मंगळवेढा टाईम्स । 

शेतकरी वर्गाने कसदार जमिनीचा पोत ढासळू नये, यासाठी सेंद्रीय शेती पिकवण्यावर भर दिला पाहिजे. अनेक ठिकाणी सेंद्रिय शेती आता मोठ्या प्रमाणावर केली जात असून रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे.

जादा पाणी व खतांच्या अतिरिक्त वापरामुळे भविष्यात जमिनी क्षारपड होण्याचा धोका आहे.रासायनिक खतांचा अमर्याद वापर टाळून याला पर्याय म्हणून शेतीचा पोत सुधारण्यासाठी शेणखताचा वापर सुरू ठेवल्याने याचे भावही गगनाला भिडले आहेत.

शेतकरी वर्गाने दोन्हीही हंगामात या खताचा सर्रास वापर सुरु ठेवल्याने तेही मिळणे दुरापास्त झाले आहे.काही वर्षापासून शेती व्यवसायात प्रगत तंत्रज्ञान वाढले असून अधिकाधिक पिकाच्या उत्पादनवाढीसाठी शेतकरी वर्गाकडून रासायनिक खताचा अमर्याद वापर होत आहे.

रासायनिक खताच्या अमर्याद वापरामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ न होता उलट जमिनीचा पोत खालावून शेती क्षारपड होण्याचा धोका आहे. कृषि विभागाने वेळीच लक्ष देवून शेतकर्‍यांना सावध करण्याची गरज आहे.


पूर्वी शेतकरी वर्गाकडून अधिकाधिक शेती पिकविण्यासाठी शेणखताचा सर्रास वापर होत होता. कालांतराने शेती व्यवसायात आमूलाग्र बदल झाल्याने व उत्पादित मालाला चार पैसे मिळू लागल्याने शेतकरीवर्गाने शेणखताऐवजी रासायनिक खतांचा वापर शेतीमध्ये करायला सुरूवात केली.

रब्बी व खरीप हंगामात सर्व पिकांना रासायनिक अथवा शेणखताचा डोस दिल्याशिवाय अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. हे सूत्र जुळून आल्याने त्याआधारेच शेती पिकवली जात आहे. एखाद्या क्षेत्रात सलग काही वर्षे उसासारखे पीक घेतल्यास जमिनीचा पोत खालावून पुढे जमिन क्षारपड होण्याचा धोका असतो.

त्याठिकाणी कोणतेही पीक घेताना अडचण निर्माण होते. अशा जमिनीला कसदार बनविण्यासाठी शेणखताची गरज भासते. शेतामध्ये रासायनिक खतांबरोबर पाण्याचेही प्रमाण सातत्याने वाढल्यास भविष्यात जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढला आहे.

ज्या शेतकर्‍यांकडे जनावरे पाळली जात नाहीत, अशांनी शेतात उत्पादित होणार्‍या उसासह इतर पिकांचे अवशेष (पाला) जाळून न टाकता सरीमध्ये त्याची योग्य कुजवणूक केल्यास आपोआपच सेंद्रीय खताची उपलब्धता होते, अशी माहिती कृषि अधिकार्‍यांनी दिली.

सध्या शेणखताचे दरही वाढले असून एका ट्रॉलीच्या शेणखताचा दर 4500 ते 5000 रु. आहे. रासायनिक खतापासून मिळणार्‍या लिंक जोड खताची बचत होत असल्याने अनेक वर्षापासून शेतकरी या खतावरच भर देत आहेत. ही ट्रॉली भरण्यासह विस्कटणे आदी कामे सहा हजाराकडे जात आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: रासायनिक खते

संबंधित बातम्या

काळजी घ्या! ‘गोवर’ची सोलापूर जिल्ह्यात एन्ट्री? उपचार सुरू; अशी आहेत आजाराची लक्षणे

हाहाकार! 12 चिमुरड्यांचा जीव घेणाऱ्या ‘कफ सिरप’बाबत समोर आली थरकाप उडवणारी माहिती; ‘तो’ विषारी घटक… महाराष्ट्र सरकार अलर्टवर, घेतला सर्वात मोठा निर्णय

October 6, 2025
सोलापूर ग्रामीणमध्ये 245 नव्या रुग्णांची भर ,आठ जणांचा मृत्यू; वाचा ‘कुठे’ वाढले

सावधान! उपासाला भगर खाताय तर ही बातमी वाचा, सोलापूर जिल्ह्यात भगरीच्या भाकरी खाल्ल्याने १२ जणांना विषबाधा

September 25, 2025
धक्कादायक : सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात 22 दिवसाच्या मुलाचा कोरोनाने मृत्यू

अजब घटना! एकाच वेळी महिलेने दिला 4 बाळांना जन्म, आता झाली सात बाळांची आई; डॉक्टरांपासून नातेवाईकांपर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी घटना

September 15, 2025
आज दिसणार वर्षातील अखेरचे चंद्रग्रहण, चुकून सुद्धा ‘हे’ काम करु नका

कामाची बातमी! चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे? आज किती वाजता लागणार चंद्र ग्रहण; जाणून घ्या सुतक काळ

September 7, 2025
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच खोकला आला अन् तरुण जिवंत झाला; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक घटना; नेमकं प्रकरण काय?

September 8, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस अन् बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू;  सोलापुरातील घटना; नेमका काय प्रकार?

September 1, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! हृदयाचा डॉक्टरच ठरला हृदयविकाराचा शिकार, प्रसिद्ध कार्डियाक सर्जनचा हार्ट अटॅकने निधन; मृत्यूचे कारण हादरवणारे

August 31, 2025
काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचा चोविसावा बळी; 46 वर्षीय पुरुषाचा मृत्यू

दोन महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली; गॅसच्या स्फोटात जखमी झालेल्या मंगळवेढ्यातील ‘त्या’ महिलेचा मृत्यू

August 24, 2025
शेतकऱ्यांनो! कृषी योजनांच्या लाभासाठी पात्र लाभार्थीनी अर्ज करावा; मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचे आवाहन

नागरिकांनो! आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मंगळवेढ्यात आज रानभाजी महोत्सवाचे आयोजन; कुठलेही रासायनिक औषधे न वापरलेल्या रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री

August 21, 2025
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

खुशखबर! राज्यात लवकरच 5 हजार 292 पोलीस हवालदार पदांची भरती होणार

ताज्या बातम्या

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांची उमेदवारी जवळपास निश्चित; रमेश भुसे यांनी केली घोषणा

October 15, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! 27 वर्षांपासून कोर्टात हेलपाटे, न्यायाची प्रतिक्षाच; न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

October 15, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

योजनेत मोठा बदल! शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता ‘एवढे’ लाख रुपये अनुदान; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

October 15, 2025
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

October 15, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज सुधाकरपंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण; दहा हजार मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप शुभारंभ; शेतकरी मेळाव्याचे आयोजन

October 15, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

दामाजीनगर गटातून रामचंद्र सलगर शेठ यांनी  निवडणूक लढवावी; विकासासाठी गटातील नागरिकांचा पुढाकार

October 15, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा