टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनामुळे मंगळवेढा तालुक्यातील एका ४० वर्षीय व्यक्तीसह जिल्ह्यातील चौघांचा मृत्यू झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
सोलापूर जिल्ह्यात नव्याने ८२ रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात चाचण्यांमधून २८ रुग्ण आढळून आले. ९० जणांनी कोरोनावर मात केली. मृतांमध्ये श्रमजीवीनगर , नीलमनगर येथील ५४ वर्षीय पुरुष , न्यू पाच्छा पेठेतील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश ४४२ आहे.
अद्यापही ११३ जण होम क्वॉरण्टाइन आहेत , तर २३ जण इन्स्टिट्यूशनल क्वॉरण्टाइन आहेत.१९ जण घरात राहूनच उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात २८८४ चाचण्यांमधून ५४ रुग्ण आढळून आले. ५३ जणांनी कोरोनावर मात केली.
मृतांमध्ये यावली, ता. मोहोळ येथील ६२ वर्षीय पुरुष, गणेशवाडी, ता.मंगळवेढा येथील ४० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
ग्रामीणमधील मृतांची एकूण संख्या झाली ११०९
ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ६ ९ ० झाली आहे. यापैकी ३५ हजार ६१७ जणांनी कोरोनावर मात केली. अद्यापही ८४ जण रुग्णालयात दाखल आहेत.
मृतांची एकूण संख्या ११०९ झाली आहे. शहरातील बाधित रुग्णांची एकूण संख्या १० हजार ८६२ झाली आहे. यापैकी १० हजार ५५ जण बरे झाले. अद्यापही २२४ जण रुग्णालयात आहेत. मृतांची एकूण संख्या ५८३ झाली आहे.(लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज