टीम मंगळवेढा टाईम्स ।
जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्लात शनिवारी सकाळी महाराष्ट्राचे आणखीन एक सुपुत्र संग्राम पाटील यांना वीरमरण आलं आहे.
एकाच आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दुसऱ्या जवानाला वीरमरण आल्यानं कोल्हापुरात शोकाकूल वातावरण आहे.
पाकिस्तानकडून याधी झालेल्या हल्ल्यात ऋषिकेश जोंधळे शहीद झाले होते आणि आज सकाळी कोल्हापूरचे संग्राम पाटील यांना वीरमरण आलं आहे.
संग्राम पाटील कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामधील निगवे खालसा या गावातील रहिवासी होते. जम्मू-काश्मीरमधील राजोरी भागात सोळा मराठा पोस्टवर पाकिस्तानने भ्याड हल्ला केला त्यामध्ये संग्राम पाटील यांना वीरमरण आलं.
ऐन दिवाळीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बहिरेवाडी गावातील जवान ऋषिकेश जोंधळे यांना वीरमरण आलं होतं त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच दुःख सावरत न सावरत तोच हा दुसरा धक्का बसला आहे.
करवीर तालुक्यातील निगवे खालचा एक छोटंसं गाव. शेतकऱ्यांच गाव अशी या गावाची ओळख याच गावात अल्पभूधारक शेतकरी अशी ओळख असलेल्या शिवाजी पाटील यांनी आपल्या मुलांना खूप कष्टाने शिकवलं संग्राम हा त्यांचा मोठा मुलगा संग्रामला भारतीय सैन्यदलात पाठवण्यासाठी वडील शिवाजी पाटील यांनी खूप परिश्रम घेतले होते.
बेळगाव मध्ये 16 मराठा रेजिमेंटमध्ये संग्राम पाटील भरती झाले होते. संग्राम पाटील यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुलेही आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज