राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीच्या त्रासाने ग्रासले असून त्यामुळे उपचारासाठी ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 10, 2020
धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वीच कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनावर यशस्वीपणे मात करून ते पुन्हा सार्वजनिक जीवनात सक्रीयही झाले होते. आता त्यांना तीव्र पोटदुखीचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते त्रस्त असून उपचारासाठी ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. ही माहिती मुंडे यांनी स्वतःच ट्विट करून दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. परळी, बीड व मुंबई असा सातत्याने प्रवास, अनेक लोकांशी थेट संपर्क यादरम्यान जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंडेंना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
त्यावेळी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामकाजाचा अहवाल त्यांनी कोरोना वॉर्डमधून सादर केला होता. कोरोनावर मात करून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे परत कामाला लागले होते.
यानंतर आता पुन्हा एकदा मुंडे उपचारासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे.धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (10 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच तब्येतीची माहिती दिली आहे.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये धनंजय मुंडेंवर उपचार सुरू होते. कोरोनावर मात केल्यानंतर मुंडेंना डिस्चार्ज देण्यात आला होता. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना धनंजय मुंडे यांनी हात उंचावून आणि हात जोडत डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.
धनंजय मुंडे यांच्यासोबत कोरोनाची लागण झालेले त्यांचे खाजगी सचिव, एक स्वीय सहाय्यक, दोन वाहन चालक, एक अंगरक्षक यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. या सर्वांची दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली होती. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज