सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 138 कोरोना रुग्ण आढळले आहेत तर पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.आज 105 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे.सध्या 1 हजार 739 रुग्ण उरले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
आज तब्बल 3 हजार 86 संशयितांची टेस्ट पार पडली असून 45 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.नव्या 138 रुग्णांची भर पडली आहे.आतापर्यंत 28 हजार 733 रुग्ण झाले बरे होऊन घरी गेले आहेत तर एक हजार 739 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सोलापूर ग्रामीणमध्ये आत्तापर्यंत 2 लाख 50 हजार 836 संशयितांची टेस्ट झाली असून आतापर्यंत ग्रामीणमध्ये 31 हजार 403 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
आज सोलापूर ग्रामीणमध्ये अक्कलकोट तालुक्यात एकही रुग्ण आढळलेला नाही.
तर बार्शीत 19, करमाळ्यात पाच, माढ्यात 14, माळशिरसमध्ये 11, मंगळवेढ्यात पाच, मोहोळमध्ये 11, उत्तर सोलापुरात सहा, पंढरपुरात 53, सांगोल्यात 12 आणि दक्षिण सोलापुरात दोन नव्या रुग्णांची भर पडली आहे.
दुसरीकडे आता अक्कलकोट तालुक्यात 19 रुग्ण उरले असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तर बार्शीतील 163, करमाळ्यातील 86, माढ्यातील 358, माळशिरसमधील 297, मंगळवेढ्यातील 56, मोहोळमधील 220, उत्तर सोलापुरातील 15, पंढरपुरातील सर्वाधिक 472, सांगोल्यातील 24 आणि दक्षिण सोलापुरातील 25 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज ‘या’ गावातील रुग्णांचे मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील 67 वर्षीय पुरुष तर जळोलीतील 80 वर्षीय पुरुष आणि भाळवणीतील 48 वर्षीय पुरुषाचा, माळशिरस तालुक्यातील महाळूंग येथील 75 वर्षीय पुरुष, उत्तर सोलापुरातील कोंडीतील 76 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज