सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा कहर कमी होताना दिसत आहे.आज नव्याने 146 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर कोरोनामुळे आज सात जणांचा मृत्यू झाला आहे.
आज 1 हजार 450 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 304 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.कोरोनामुक्त झाल्याने आज 182 जणांना घरी सोडले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 29 हजार 571 एवढी झाली आहे. कोरोनाग्रस्त असल्यामुळे अद्यापही तीन हजार 69 जण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत 869 जणांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुक्त झाल्याने 25 हजार 633 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज ‘या’ गावातील रुग्णांचे मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील 75 वर्षांचे पुरुष, देगाव (ता. पंढरपूर) येथील 70 वर्षाची महिला, चारे (ता. बार्शी) येथील 60 वर्षाचे पुरुष, कालिकादेवी चौक पंढरपूर येथील 75 वर्षाची महिला, सुतार नेट बार्शी येथील 65 व 66 वर्षाचे पुरुष, टाकळी रोड पंढरपूर येथील 80 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात 20 जण पॉझिटिव्ह,दोघांचा बळी!
सोलापूर शहरातील रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे.आतापर्यंत शहरातील एकूण टेस्टपैकी 80 हजार 80 संशयितांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, शहरातील आठ हजार 278 रुग्णांनी कोरोनावर मात करुन घर गाठले आहे. तर आता शहरातील अवघे 564 रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.
शहरात आज हब्बू वस्ती (देगाव नाका), समाचार चौक (शुक्रवार पेठ), आयोध्या नगर (एसआरपीएफ कॅम्प), यशलक्ष्मी (विशाल नगर), वसंत नगर पोलिस लाईन येथे तीन, राघवेंद्र नगरात दोन (मजरेवाडी), कर्णिक नगर, अंत्रोळीकर नगर, कुमार चौक (रेल्वे लाईन), जवान नगर, रेवणसिध्देश्वर नगर (विजयपूर रोड), निलम नगरात तीन, होटगी रोड आणि दक्षिण सदर बझार परिसरात दोन, अशा एकूण 20 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज