mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लवकर करा सोनं खरेदी! दोन महिन्यांत ५५०० रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात १६,००० रुपयांची घट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 18, 2020
in राज्य, राष्ट्रीय

उत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु मागणी नसल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) वाढ होत नाहीय. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 50,653 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. चांदीदेखील 61,512 रुपये प्रति किलो (Silver Price Today) च्या पातळीवर बंद झाली.  Buy gold Silver down by Rs 5,500 in two months, silver down by Rs 16,000

गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात जोरदार चढ-उतार दिसून आले. सोन्याचे आताचे दर सर्वकालीन उच्च दरापेक्षा प्रति 10 ग्रॅम सुमारे 5500 रुपयांनी स्वस्त (Gold price fall) झाले आहेत.तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत प्रति किलो (Silver Price Fall) सुमारे 16000 रुपयांनी घसरण झाली आहे.

7 ऑगस्ट 2020 या दिवशी सोन्या-चांदीच्या दराने आतापर्यंतची सर्वाधिक किंमत गाठली होती. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी त्यांचा उच्चांक गाठला होता. सोन्याने प्रति १० ग्रॅम, 56,२०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली,

तर चांदी प्रति किलोला 77,8400 रुपयांवर पोहोचली होती. यानंतर सोन्यामध्ये आतापर्यंत प्रति ग्रॅम 5547 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी प्रति किलो 15,844 रुपयांनी खाली आली आहे.

बाजारातील मागणी कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी व्य़वहारही कमी केले आहेत. यामुळे वायदा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 0.09 टक्क्यांची घट झाली.

सोने 50,665 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरचा सोन्याचा वायदा भाव 47 रुपयांनी घटला होता. याबाबत 14,585 लॉटमध्ये व्यापार झाला. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.10 टक्क्यांनी वधारून ते 1,910.90 डॉलर प्रति औंस झाले.

चांदीची मागणी वाढली

स्पॉट मार्केटमध्ये जोरदार मागणी असताना स्थानिक वायदा बाजारीतल व्यापाऱ्यांची मागणी वाढली होती. यामुळे चांदीचे दर 461 रुपयांनी वाढून 61,996 रुपये प्रति किलो झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव डिसेंबरच्या 461 रुपयांनी किंवा 0.75 टक्क्यांनी घसरून 61,996 रुपये प्रतिकिलोवर आला.

त्यात 15,581 लॉटसाठी व्यापार झाला. बाजारातील विश्लेषकांनी सांगितले की चांदीच्या किंमतीतील वाढीमागील मुख्य कारण म्हणजे स्थानिक बाजारपेठेतील मागणीमुळे व्यापाऱ्यांकडून नवीन सौदे खरेदी करणे. न्यूयॉर्कमध्ये चांदी 0.71 टक्क्यांनी वाढून 24.40 डॉलर प्रति औंस झाली.

असा ठरतो सोन्याचा भाव?

डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही.

भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते.

पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत.

बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना अशी नावे आहेत. सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो.

सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते.

Buy gold Silver down by Rs 5,500 in two months, silver down by Rs 16,000

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: 000500 in two monthsBuy gold Silver down by Rs 5silver down by Rs 16

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

चिंताजनक! राज्यात ‘या’ रोगाचा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन; लक्षणे आणि उपचार?

September 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! माजी सैनिकानं आधी बायकोला संपवलं; मुलावरही जीवघेणा हल्ला; मग स्वतः भीमा नदीकाठी गळ्याला दोर लावला

September 3, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सावधान! नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई

September 2, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जि.प. अन् पं.स.मध्ये नामनिर्देशित सदस्यांसाठी नियम निश्चित; विविध क्षेत्रांतील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींना मिळणार प्रतिनिधित्व

August 29, 2026
Next Post

मोहोळ : शेतीच्या नुकसानीची बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा