मंगळवेढा तालुक्यात मागील दोन दिवसापासून पडत असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे मंगळवेढा शहरात 6 घरांची तर 81 गावामधून 200 घरांची पडझड झाली असून या पडझडीचे तलाठयांना पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
दरम्यान,भिमा नदीला आलेल्या महापुरामुळे 393 कुटुंबे स्थलांतरीत करण्यात आली असून 830 लोक बेघर झाले आहेत.शेतीपिकाचे 33 टक्के नुकसान झालेल्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील भिमा नदीपात्रात उजनी व वीर धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे नदीकाठावरील ब्रम्हपुरी, बठाण, उचेठाण, रहाटेवाडी,तामदर्डी,सिध्दापूर तर माण नदीकाठावरील मारापूर,घरनिकी येथील 393 कुटुंबे स्थलांतरीत करण्यात आली आहेत.
तर या भागातील 830 लोक बेघर झाले आहेत.स्थलांतरीत केलेल्या लोकांना जि.प.शाळा, माध्यमिक प्रशाला व ज्याच्या त्याच्या सोयीने नातेवाईकांकडे रहाण्याची सोय करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
नंदूर येथील एका पशूपालकाच्या दोन शेळयांच्या अंगावर भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.पडलेल्या पावसामुळे व भिमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकर्यांच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नदीकाठावरील 11 गावच्या परिसरात नदीचे पाणी ऊस पिकात घुसल्याने ऊसाची पिके आडवी पडली आहेत.माचणूर येथील भिमा नदीच्या पुलावर दुसर्या दिवशीही पाणी असल्यामुळे सोलापूर-कोल्हापूर हा महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे.
माचणूर येथे जवळपास दीड ते दोन कि.मी.तर मंगळवेढा टोळ नाक्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र आहे.सुरक्षेच्या दृष्टीने भिमा नदीकाठावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. पुराचे पाणी पाहण्यासाठी मंगळवेढा येथील व परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याने बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना गर्दी हटविणे नाकीनऊ आले होते.
तीर्थक्षेत्र माचणूर मंदिरात महापुराचे पाणी आल्यामुळे मंदिर जलमय झाले आहे.नदीपात्रातील जटाशंकर मंदिर मागील चार दिवसापुर्वीच पाण्याखाली गेले आहे.
Two hundred houses collapsed due to rain in mangalwedha; The floods on the Bhima River left 830 people homeless
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज