mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर शहर व ग्रामीण भागात 210 नवे कोरोनाबाधित; आठ जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 15, 2020
in सोलापूर

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा कहर हळूहळू कमी होताना दिसत आहे. आज नव्याने 182 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. Solapur city and rural areas 210 new corona in  Eight people died

आज करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या अतिशय कमी होती. त्यातही 182 जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर आज कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यूही झाला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज केवळ 978 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 796 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 182 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तपासणी केलेल्यांची संख्या कमी असूनही पॉझिटिव्ह असलेल्यांची संख्या जास्त आल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 28 हजार 577 जण कोरोनामुळे बाधित झाले आहेत तर 795 जणांचा मृत्यू झाला आहे.

अद्यापही कोरोनाग्रस्त झाल्याने चार हजार 101 जणांवर वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झाल्याने 23 हजार 681 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आज ‘या’ गावातील आठ जणांचे मृत्यू

करमाळा तालुक्यातील शेलगाव येथील 50 वर्षाची महिला, तपकिरी शेटफळ (ता. पंढरपूर) येथील 62 वर्षाची महिला, अर्जुंसोंड (ता. मोहोळ) येथील 47 वर्षाचे पुरुष, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील 55 वर्षाचे पुरुष, दुधनी (ता. अक्कलकोट) येथील 74 वर्षाचे पुरुष,

तर अकोले बुद्रुक (ता. माढा) येथील 58 वर्षाचे पुरुष, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील 75 वर्षाचे पुरुष, लाईफ लाईन हॉस्पिटल शेजारी पंढरपूर येथील 67 वर्षाच्या महिलेचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात 28 जणांना लागण

सोलापूर महापालिका हद्दीत आज 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,आजच्या अहवालानुसार 32 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज कोरोना चाचणीचे 312 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामधील 284 अहवाल निगेटिव्ह आले असून 28 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 14 महिला आणि 14 पुरुषांचा समावेश आहे.

आजच्या अहवालांमध्ये एकही व्यक्ती मृत दाखविण्यात आलेला नाही. सोलापूर महापालिका हद्दीतील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 9 हजार 166 झाली आहे.

आज नव्याने आढळलेल्या बाधितामध्ये कुंभार वेस जोडभावी पेठ, भवानी पेठेतील मराठा वस्ती, शांतीनगर देसाई नगर, अक्कलकोट रोड वरील गांधीनगर, चौपाड, आसरा येथील महाराष्ट्र बॅंक कॉलनी, विजापूर रोड, रेल्वे लाइन्स, शेळगी,

तर नवीन आरटीओजवळ, होटगी रोड, देगाव, होटगीवरील काजल नगर, एकता नगर, विजापूर रोडवरील नम्रता नगर, कुमठा नाका, बाळीवेस येथील मराठा वस्ती, भवानी पेठ येथील वर्धमान नगर, भवानी पेठेतील नागणे अपार्टमेंट, होमकर नगर जवळ, वामन नगर, मजरेवाडीतील भारत माता नगर, अभिषेक नगर, विश्राम हाउसिंग सोसायटी या ठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

बंगला विकणे आहे.

३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.

संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur city and rural areas 210 new corona in Eight people died

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते देवेंद्र फडणवीसांचा सत्कार; मालकांनी ठरल्याप्रमाणे केलं… आता संधी मिळणार का? परिचारक समर्थकांचा सवाल

​आता नाही तर कधीच नाही! परिचारकांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा की भाजप पुन्हा धक्का देणार? विधान परिषदेच्या निवडणुकीने राजकारण तापलं; पालकमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

April 20, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 20, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
Next Post
भीमा नदीकाठ गावांना धोक्याचा इशारा! उजनीतून भीमा पात्रात ‘एवढ्या’ लाख क्यूसेसचा विसर्ग

सोलापूर जिल्हा परतीच्या पावसाने हादरला! आत्तापर्यंत 565 गावात पाणी; 14 जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू , शिक्षक नवऱ्याविरोधात गुन्हा; नेमकं काय घडलं?

April 26, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा