mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार, पुलावर पाणी; ‘हे’ दोन महामार्ग वाहतुकीसाठी राहणार बंद

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 15, 2020
in सोलापूर, राज्य

उजनी धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भीमा नदीला पूर येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोलापूर-मंगळवेढा व पंढरपूर-मंगळवेढा हे दोन महामार्ग बंद करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याची माहिती मंगळवेढा तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली आहे.

तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी पूल पाहणी केली.भीमा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची वाढ होताना दिसत असुन बेगमपूर पुलावर पाणी येणार आहे. व पंढरपूर सिध्देवाडी येथील माण नदीच्या पात्रात वाढ झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे दोन महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवारी पावसाने हाहाकार माजविला आहे. मंगळवारी दिवसभरात 59.6 मि.मी., तर बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 78.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण 138.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शेतीसह मालमत्तेचे नुकसान, जनावरे दगावण्याची तसेच घरांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मंगळवारी सुरु झालेला पाऊस बुधवार रात्रीपर्यंत सुरुच होता. पावसाचा जोर कमी-अधिक प्रमाणात वाढत होता.

मंगळवेढा तालुक्यातील ,खोमनाल,पाठखल, अकोले, गुंजेगाव,बावची, जिंती, पौट, सलगर खुर्द आदी रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले होते. सांगोला तालुक्यालाही या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी शेतातील सकल भागात पाणी साचले आहे. ओढे आणि नाले भरभरुन वाहत आहेत. त्यामुळे शेतातील माती आणि बांध वाहून जाण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत.

अक्कलकोट तालुक्यात पावसाचा जोर अधिक असल्याने तालुक्यातील ओढे, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. तालुक्यातील कुरुनूर धरण भरल्याने पाणी खाली सोडण्याची वेळ आली. दुसरीकडे अक्कलकोट शहरातील जुन्या राजवाड्याला अतिवृष्टीचा फटका बसला असून राजवाड्याचा बुरुज पावसाने ढासळला आहे. शिरसी पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद केली.

बार्शीतही पावसाचा जोर कायम होता. भोगावती नदी दुथडी भरुन वाहत आहे. तालुक्यातील लघु आणि मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. शहरातील अनेक भागांत पाणी साचले आहेे. ग्रामीण भागातही जोरदार पाऊस असल्याने शेती पिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील होनसळ ओढ्याला पाणी आल्याने मार्डी-होनसळ मार्ग वाहतुकीसाठी बंद केला होता. नान्नज मोहितेवाडी गावचा संपर्क तुटला होता. दक्षिण सोलापूर सिंदखेड ते मद्रे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. तीर्थ, दिंडूर, लिंबीचिचोळी या गावांत अनेक घरांची पडझड झाली होती. मोहोळ तालुक्यातील विरवडे ते पाकणी येथील सीना नदीवरील वाहतूक बंद केली होती. पंढरपूर तालुक्यातही पावसाने हाहाकार माजविला होता.

करमाळा तालुक्यातील शेलगाव आणि वरकटणे या गावांत अनेक घरांची पडझड झाली होती. जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांच्या उडीद, मूग, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर फळबागांनाही या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांच्या कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

सोलापूर शहरात मंगळवार, बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झोपडपट्टी, नगर, वसाहतींच्या घरांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. नगरसेवक मदतीला धावले तरी मनपा प्रशासन सुस्त असल्याची ओरड होती. दरम्यान, दुपारून महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्यासह अधिकार्‍यांनी नगरसेवकांसह परिस्थितीची पाहणी केली. ‘स्मार्ट सिटी’ची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्‍तांनी दिल्या आहेत.

 

जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी शोध आणि बचाव पथके तसेच साहित्य यांची व्यवस्था करावी, आपत्ती व्यवस्थापन विभागांनी सर्व कर्मचारी उपलब्ध ठेवावेत, दुर्घटना घडल्यास तातडीने बचाव कार्य करावे, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

 

वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणांची आगाऊ माहिती मिळविण्यासाठी नागरिकांनी ‘दामिनी लाईटनिंग अ‍ॅलर्ट’ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी 0217-2731012 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Rains in Solapur district Solapur Pandharpur Mangalvedha highway will be closed for traffic

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

आंदोलक बांधवांच्या पाठीशी मंगळवेढ्याचे वकील खंबीर; कोणतीही कायदेशीर कारवाई झाल्यास लढणार विनामूल्य लढा; मोफत कायदेशीर मदतीची घोषणा

September 12, 2026
Next Post
दुर्दैवी घटना! चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून, सहा जणांचा मृत्यू, घटनास्थळी आक्रोश

चंद्रभागा नदी घाट कोळसून सहा जणांच्या मृत्यूप्रकरणी 'या' ठेकेदारा विरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 18, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा