टीम मंगळवेढा टाईम्स । तुम्ही तर नोकरीच्या शोधात असाल तर मग लगेच अर्ज करा कारण,कोरोना या महामारीच्या काळात अनेकजण बेरोजगार झाले. अनेकांच्या हाताला काम नाही. देशात आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदीत एसबीआयनं अधिकारी व्हाययची संधी दिली आहे.
State bank of india एसबीआयमध्ये अधिकारी पदासाठी विविध ९२ जागा निघाल्या आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी फायद्याची आहे.
देशातील सर्वात मोठ्या बँक असलेल्या एसबीआयने ९२ स्पेशलिस्ट केडर अधिकारी व इतर पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छूक उमेदवार १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या दरम्यान ऑनलाईन नोंदणी करु शकतात.
एक व्यक्ती फक्त एकाच पदासाठी अर्ज करु शकतो असा नियम एसबीयाने या भरती प्रक्रियेत राबावला आहे. सर्वसाधारण / ओबीसी / ईडब्ल्यूएस उमेदवारांना ७५० रुपयांचं शुल्क असेल तर अनुसूचित जाती / जमाती / पीएच उमेदवारांना कोणतीही फी नाही.
परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा ऑफलाइन पद्धतीनं भरावं लागेल.
कोणत्या पदांसाठी भरती अन् शैक्षणिक पात्रता काय?
१) उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) – ११ पदे.
शैक्षणिक पात्रता- बी.टेक / एमटेक मध्ये संगणक विज्ञान / आयटी / डेटा विज्ञान / मशीन लर्निंग आणि एआय मध्ये बी.टेक / एम टेक आणि 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
२) व्यवस्थापक (डेटा वैज्ञानिक) – ११ पदे.
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता वरील प्रमाणे, पण अनुभव ५ वर्षे.
३) उपव्यवस्थापक (सिस्टम अधिकारी) – ५ पदे. शैक्षणिक पात्रता- उपव्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) प्रमाणेच आहे.
४) डेटा संरक्षण अधिकारी – एक जागा
पात्रता – १५ वर्षांच्या अनुभवासह बैचलर डिग्री.
या पदांवरही संधी :- – रिस्क स्पेशियलिस्ट – १९ पदे, पोर्टफोलियो मॅनेजमेंट स्पेशलिस्ट स्केल II – ३ पोस्ट, मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट) – ५ पद, डिप्टी मॅनेजर (सिक्योरिटी) – २८ पद, असिसमेंट जनरल मॅनेजर – १ जागा, वरिष्ठ सलाहकार विश्लेषक – एक जागा, डेटा ट्रांसलेटर – एक जागा आणि डेटा ट्रेनर – एक जागा.
अधिक माहितीसाठी आपण https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
State Bank of India SBI has fielded 92 officers for various posts
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज