मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
साडेतीन एकर जमीन विकून आलेल्या मोबदल्यातील ७८ लाख रुपये तरुणाने ऑनलाइन चक्री गेममध्ये गमावले.
ही घटना ८ मे २०२३ पासून १८ एप्रिल २०२४ च्या दरम्यान लऊळ (ता. माढा) येथे घडली. याबाबत दि.१२ फेब्रुवारी रोजी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बालाजी विष्णू खारे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी नितीन पाटमस, रणजित सुतार, वैभव सुतार (सर्व रा. कुईवाडी, ता. माढा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या नावावर लऊळ हद्दीत १२ एकर शेती होती. त्यापैकी साडेतीन एकर जमीन ८२ लाखांत विकली होती.
मागील एक वर्षापूर्वी फिर्यादीच्या गावातील एसटी स्टॅडच्या झाडाखाली काही लोक व मुले ऑनलाइन गेम खेळत असल्याचे फिर्यादीने पाहिले होते. यातूनच आरोपीची ओळख झाली होती.
त्यावरून त्याने फिर्यादीच्या मोबाइलवर ऑनलाइन चक्री गेमचे अॅप डाउनलोड करून दिले. ऑनलाइन स्वरूपात व्यवहार करत ७८ लाख रुपये फिर्यादीने ऑनलाइन चक्री गेममध्ये गमावले. याप्रकरणी आरोपी यांनी फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज