mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दमदार आमदार! आ.समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याला यश; विविध विकास कामांसाठी ५७ कोटी ६८ लाखांचा निधी; ‘हे’ रस्ते झाले मंजूर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 18, 2023
in मंगळवेढा
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा कार्यक्षेत्रातील भारत देशाची दक्षिण काशी म्हणून ख्याती असणाऱ्या पंढरपूर शहराच्या व मंगळवेढा तालुक्यातील विविध रस्त्यांच्या विविध प्रलंबित विकास कामांसाठी चालू पावसाळी अधिवेशनादरम्यान ५७ कोटी ६८ लाख रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.

आमदार आवताडे यांनी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांची पूर्तता होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या निधीसाठी पत्रव्यवहार केला होता. आमदार आवताडे यांच्या या मागणीची दखल घेऊन पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाची सद्य काळात असणारी इमारत फार जुनी झाली असल्याने याठिकाणी उपविभागीय कार्यालयाच्या दोन इमारती उभारणीसाठी ६ कोटी ३७ लाख रुपये इतका निधी मंजूर झाला आहे.

त्याचबरोबर पंढरपूर येथील सार्वजनिक बांधकाम विश्रामगृह याठिकाणी नवीन विश्रामगृह उभारणीसाठी आवश्यक निधी मिळण्यासाठीही आमदार आवताडे यांनी पाठपुरावा केला होता.

देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी पंढरपूर हे एक अध्यात्मिक केंद्रस्थान आहे. त्यामुळे पंढरपूर येथे अनेक अतिमहत्त्वाच्या व महत्त्वाच्या व्यक्ती दर्शनासाठी येत असतात.

या शासकीय विश्रामगृहामध्ये सध्या दहा कक्ष आहेत परंतु येथे येणाऱ्या व्यक्तींची संख्या पाहता सदर ठिकाणी सुसज्ज शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी २१ कोटी १४लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मतदारसंघातील विविध गावांना व निरनिराळ्या ठिकाणी जोडणारे अनेक रस्ते काळ्या मातीतून जात असल्याने या ठिकाणी वाहतुकीला व दैनंदिन रहदारीला अडथळा निर्माण होऊन अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सदर रस्ते सुधारित व पक्के करण्यासाठी आ आवताडे यांनी काही रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. या रस्त्यांच्या सुधारणा विकास कामांसाठी २६ कोटी ८४लाख इतका निधी मंजूर झाला आहे.

या निधी अंतर्गत मंजूर झालेले रस्ते –

मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव आंधळगाव पाटखळ नंदेश्वर भोसे हुन्नूर रेवेवाडी (खडकी ते नंदेश्वर) व (भोसे ते हुन्नूर) मध्ये सुधारणा करणे ५ कोटी, घेरडी हुन्नूर मारोळी सलगर ते प्रजिमा-८ मिळणारा रस्ता( लवंगी ते आसबेवाडी) रस्ता सुधारणा करणे १०कोटी , पंढरपूर तालुक्यातील तावशी ते चिचुंबे रस्ता सुधारणा करणे तसेच तावशी ते चिचुंबे मार्गावर व्ही आर-८६ येथे लहान पुलाचे बांधकाम करणेसाठी २ कोटी ८४ लाख, एमएसएच-८ भालेवाडी डोणज नंदुर रस्ता सुधारणा करणे ९कोटी.

सर्वांगीण विकासासाठी आणि धोरणात्मक प्रगतीसाठी नेहमीच आग्रही असणारे लोकप्रतिनिधी : तानाजी काकडे

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि धोरणात्मक प्रगतीसाठी आपल्या नेतृत्व साधनेच्या माध्यमातून नेहमीच आग्रही असणारे लोकप्रतिनिधी म्हणून आ समाधान आवताडे यांची मतदारसंघामध्ये विविध विकासकामांच्या माध्यमातून प्रतिमा उंचावत असल्याचे चित्र आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या रस्ते, वीज पाणी, शिक्षण, आरोग्य आदी सेवाक्षेत्रांच्या कार्यपूर्ततेसाठी आ आवताडे हे नेहमीच भरघोस निधीच्या रूपाने प्रयत्नशील असतात – तानाजी काकडे (माजी मिस्टर सभापती पं.स. मंगळवेढा)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 3, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

मंगळवेढेकरांच्या पसंतीला उतरणार चवीचं नवं ठिकाण; ‘हॉटेल महालोक’ आजपासून सेवेत सज्ज; नाष्टा, स्पेशल समुद्री मासे, चिकन मटण मध्ये असंख्य व्हरायटी व व्हेज स्पेशल किचन

March 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
Next Post
मोठी बातमी! पंधरा वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा खून व दरोड्यातील मंगळवेढ्यातील आरोपी झाला अखेर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

मोठी बातमी! पंधरा वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा खून व दरोड्यातील मंगळवेढ्यातील आरोपी झाला अखेर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा