टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतकऱ्याला दिवाळीला ४०० हप्ता द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कली असून याबाबत संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले यांच्या नेतृत्वाखाली दामाजी शुगरचे कार्यकारी संचालकांना निवेदन देण्यात आले.
मागील वर्षी दामाजी कारखान्याकडे गळितास आलेल्या ऊसाला प्रति टन २३०० रुपयाचा हप्ता दिलेला आहे परंतु साखरेचे दर लक्षात घेता एफआरपी पेक्षा जास्त चारशे रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना देणे सहज शक्य आहे.
दामाजी कारखाना अडचणीत असताना मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कारखान्यावरती विश्वास दाखवून व माझ्या तालुक्यातला सहकारी साखर कारखाना टिकला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी ऊस दिलेला आहे.
यावर्षी पाऊस काळ कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत साखरेला दर हे चांगला मिळाल्यामुळे कारखाना सुद्धा फायद्यात आहे म्हणून शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे उसाचे पैसे मिळायला पाहिजेत.
यावर्षी उसाच्या वजनामध्ये घट येणार वजनामध्ये घट येणार आहे एकरी उत्पादन सुद्धा कमी निघणार आहे कारखान्याला ऊस सुद्धा कमी पडणार आहे त्यामुळे दिवाळीपर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्याला गेल्यावर्षीच्या तुटलेल्या ऊसाला चारशे रुपयांचा हप्ता दिला तरच शेतकरी दामाजी कारखान्याला ऊस घालेल.
या सर्व गोष्टीचा विचार करून कारखान्याचे गाळप व्यवस्थि व्हायचे असेल तर शेतकऱ्यांना तात्काळ ४०० रुपये हप्ता देणे उचित होईल व कारखाना सुद्धा अडचणीत येणार नाही असे त्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हा संघटक युवराज घुले, आबा खांडेकर, संतोष सोनगे, सिद्धराम व्हनुटगी, आप्पासो पाटील, श्रीकांत पाटील, बाबासो कापले, विक्रांत पाटील, रोहित भोसले, पांडुरंग बाबर, सुनील बंडगर, राजेंद्र रणे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्याची दिवाळी गोड करावी
गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा शेतकऱ्याला चारशे रुपयाचा हप्ता देऊन शेतकऱ्याची दिवाळी गोड करावी अन्यथा कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळाचे दिवाळी गोड होऊ देणार नाही शेतकरी संघटनेचे संघर्ष अटळ आहे. – युवराज घुले, जिल्हा संघटक
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज