टीम मंगळवेढा टाईम्स।
वैद्यकीय व्यवसायाच्या वाढीसाठी बँकेचे कर्ज मंजूर करून देतो, असा विश्वास संपादन करून वेळोवेळी ऑनलाइन, आरटीजीएस व रोख असे २८ लाख रुपये घेऊनही कर्ज मंजूर न करता आपली फसवणूक झाल्याची
तक्रार प्रिया आप्पासाहेब बसवंती ( वय ४०. प. मंगळवार पेठ, सोलापूर) यांनी जोडभावी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गणेश पुंडलिक भापकर व देतो, तेजल भापकर (रा. दौंड, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. ही घटना मार्च २०२० पासून आजतागायत नॉर्थ कसबा येथे घडली.
फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या वाढीसाठी दीड कोटींची आवश्यकता असल्याने बँक लोन करण्यासाठी मार्च २०२०मध्ये अस्पदा फायनान्शियल सर्व्हिस रिजनल डिव्हिजन ऑफिस डिसीजन टॉवर, बिबेवाडी येथे गेले होते.
तेथे गणेश भापकर व तेजल भापकर या पती-पत्नींची भेट झाली. गणेश याने अस्पदा फायनान्शियलचे डायरेक्टर असल्याचे आयडी दाखवले. पत्नी एचडीएफसी बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये मोठ्या हुद्यावर असल्याचे सांगितले.
फिर्यादीला तीन आठवड्यात ३ कोटी ५० लाखांचे कर्ज मंजूर करून असे सांगितले. यासाठी त्यांनी कर्ज मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रे व कमिशन म्हणून वेळोवेळी रोख, आरटीजीएस, ऑनलाइन असे २८ लाख रुपये दिले.
मात्र, आजतागायत कर्ज मंजूर केली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत म्हणून भापकर पती पत्नीविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज