टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील बठाण येथील समर्थ कृषी केंद्रामध्ये २५ बॅगा बनावट खत आढळल्याप्रकरणी त्या दुकानाचा खतविक्रि परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
सदर दुकानातून बनावट खताची विक्री होत असल्याची तक्रार येथील एका शेतकऱ्याने ऑनलाईन कृषी विभाग सोलापूर यांच्याकडे केली होती.
त्यानुसार कृषी विभागाने तपासणी करून प्रयोगशाळेकडून अहवाल आल्यानंतर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
दि. २२ जुलै रोजी केलेल्या तपासणीत या दुकानात डीएपी १८:४६ खताच्या २५ बॅगा बनावट आढळल्या होत्या. या खतासाठी वापरलेल्या बॅगा पॅरादीप फॉस्फेट ओडिसा कंपनीच्या वापरल्या आहेत.
सदर ठिकाणी आढळलेल्या खताचा पंचनामा करून न्यायालय दोषारोप पत्र लवकरच लवकरच दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत सदर कंपनीला कळवण्यिात आले असून कंपनीचा प्रतिनिधी पाहणीसाठी येणार आहे. खत दुकानाचे विजय गुंडोपंत बळवंतराव यांच्या नावे सदरचे परवाना असून पुढील आदेश होईपर्यंत हा परवाना निलंबित करण्यात आल्याचे मंगळवेढा पंचायत समिती कृषी अधिकारी विनायक तवटे यांनी सांगितले.
दरम्यान या निलंबनाचा आदेश जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी बजावला आहे.
खत दुकानांची तपासणी वेळेवर व्हावी
खत दुकानांची तपासणी वेळेवर केली जात नसल्याने बनावट खते विक्रीचा राजरोज सुरू आहे. याप्रकरणी संबंधित पं.स.चे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे.- युवराज घुले, जल्हिा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना.
शेतकऱ्यांनी बिलाची पावती घ्यावी
बोगस खते बियाणे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा शेतकऱ्यांनी खते व बियाणे घेताना पक्के बिलाची पावती घेऊन ती जपून ठेवावी. पॉश मशीन द्वारे शेतकऱ्यांनी खते, बियाणे घ्यावीत.- विनायक तवटे, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, मंगळवेढा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज