टीम मंगळवेढा मंगळवेढा
गणेशोत्सवाच्या काळात व ईद ए मिलाद निमित्त तालुक्यात शांतता वा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मंगळवेढा पोलिस ठाण्याने दिलेल्या २२ जणांच्या तडीपारीच्या प्रस्तावाला

उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी यांनी मान्यता देवून तडीपार केले असून यामध्ये शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे.

मंगळवेढ्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्ढे यांनी दारू, जुगार, मटका, मारामारी, गुंडगिरी यासह सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या २२ जणांच्या दाखल केलेल्या प्रस्तावावर प्रांताधिकारी यांनी तडीपारीस मान्यता दिली आहे.

तडीपार झालेल्या व्यक्तींना तालुक्यातूनहद्दपार करण्यात आल्यानंतर त्यांना तडीपार काळात तालुक्यात राहता येत नाही.

यादरम्यान तालुक्याच्या हद्दीत आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचे पोलिसनिरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी सांगितले आहे.

तडीपार झालेल्यांची नावे तालुक्यातून तब्बल २२ प्रस्तावास तडीपारीच्या प्रस्तावास मंजुरी पुढीलप्रमाणे
भीमराव हत्तीकट, राजू पुजारी, अप्पा पुजारी, चिवडप्पा चिंचोळकर, रंगाप्पा चिंचोळकर, भारत कोळी, नागेश मंडले, सुरज आवघडे, वैभव रजपुत, वसंत चव्हाण, चैतन्य धनवे, विजय महानूर, आकाश जाधव,
संकेश्वर मासाळ, संतोष हजारे, चंद्रकांत गरांडे, राहुल बनसोडे, शैलेश बळवंतराव, शालन जाधव, संजय गायकवाड, दत्तात्रय कळकुंबे, रावसाहेब दौलतोडे यांना गणेशोत्सव काळातहद्दपारकरण्या त आले असल्याची माहिती प्रांताधिकारी बी.आर. माळी यांनी दिली.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











