मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
विठ्ठलाच्या पंढरीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या जलतरण तलावात बुडून एका २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. यशराज माने असं या तरुणाचं नाव असून या तरूणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जलतरण तलाव व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तींनी नीट व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचं आता सांगण्यात येत आहे.
एकदाच दीड लाखांची गुंतवणूक,नंतर नुसता पैसाच पैसा; तरुण शेतीतून करतोय लाखोंची कमाई
अल्प जागेत, कमी वेळात आणि तुलनेने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी मशरूम शेती आता शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे.
अनेक शेतकरी या शेतीकडे वळत असून, सरकारी अनुदानाच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर नफा मिळवत आहेत.हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातील मुनीश यांनी यशस्वीपणे हा प्रयोग करून दाखवला आहे.
कशी झाली सुरवात
चार वर्षांपूर्वी मुनीश यांनी आपल्या मित्र सुशीलच्या मार्गदर्शनाखाली मशरूम शेती सुरू केली. सुरुवातीला 12×24 फूटाच्या जागेत प्रायोगिक तत्त्वावर मशरूम लागवड करण्यात आली. मेहनत, सातत्य आणि योग्य नियोजन यामुळे केवळ तीन वर्षांत मोठा नफा मिळवण्यात त्यांना यश आले.
त्यानंतर त्यांनी आपल्या उत्पन्नाचा पुनर्विनियोग करून दोन कालव्यांमध्ये तीन मोठे शेड उभारले. या शेडसाठी 1.50 ते 2 लाख रुपये खर्च आला. तापमान योग्य राखण्यासाठी शेड्स पॉलिथिन आणि पेंढ्याने झाकण्यात आले. दुसऱ्या वर्षी बांधकामाचा खर्च टळल्याने नफा आणखी वाढला.
मशरूम उत्पादनासाठी आवश्यक घटक
मशरूम उत्पादनासाठी गव्हाचा भुसा, युरिया आणि जिप्सम यांच्या मिश्रणातून कंपोस्ट तयार करणे गरजेचे असते. हे मिश्रण सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने कुजवले जाते. योग्य हंगाम – ऑक्टोबर ते मार्च हा मशरूम उत्पादनासाठी सर्वोत्तम कालावधी आहे.तापमान हे 15-22 अंश सेल्सियस असावे.आर्द्रता 80-90% असणे गरजेचे आहे.
किलोला मिळतोय 120 रु भाव
मुनीश यांनी उत्पादित मशरूम स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले, जिथे त्यांना प्रतिकिलो 100 ते 120 रुपये दर मिळतो. प्रत्येक पॅकेट साधारणतः 200 ग्रॅम वजनाचे असते,यामुळे विक्री सुलभ होते.
कर्नालमध्ये मशरूम शेतीचा विस्तार
सध्या कर्नालमध्ये 30 हून अधिक स्थिर मशरूम युनिट्स कार्यरत आहेत. हिवाळ्यात हंगामी मशरूम उत्पादन चांगले होते, त्यामुळे अनेक शेतकरी हंगामी शेड तयार करून उत्पादन घेत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज