टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्स चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसाला प्रती मे. टन २७११ रूपयाप्रमाणे दर देणार असल्याची माहिती चेअरमन उमेश परिचारक यांनी दिली.
युटोपियन शुगर्स या कारखान्याने यापूर्वीच हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या उसास प्रती मे.टन २५११ रूपयाप्रमाणे पहिली उचल जाहीर केलेली होती. त्यामध्ये आता २०० रूपयाची वाढ करून २७११ रूपयाप्रमाणे सुधारीत दर देण्यात येणार आहे.
लवकरच पहिल्या पंधरवडयाच्या बिलाची रक्कम ऊस उत्पादक यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे परिचारक यांनी सांगितले.
तरी सर्व ऊस पुरवठादार, शेतकरी व तोडणी वाहतूक ठेकेदार यांनी या सुधारीत दर बदलाची नोंद घेऊन गाळप हंगाम २०२३-२०२४ करीता जास्तीत जास्त ऊस युटोपियन शुगर्स कडे गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन परिचारक यांनी केले आहे.
याप्रसंगी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन परिचारक यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज