सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 2 हजार 385 संशयितांमध्ये 84 व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या असून चौघांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 33 हजार 947 रुग्णांनी केली कोरोनावर मात; आज 152 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर ग्रामीणमध्ये आता उरले एक हजार 421 रुग्ण; आतापर्यंत एक हजार 63 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
ग्रामीणमध्ये आज अक्कलकोट तालुक्यात एक, बार्शी तालुक्यात 28, करमाळ्यात चार, माढ्यात 12, माळशिरसमध्ये नऊ, मोहोळमध्ये दोन, पंढरपुरात 24 आणि सांगोला तालुक्यात चार रुग्ण आढळले आहेत
दिलासादायक बाब म्हणजे उत्तर सोलापूर, मंगळवेढा व दक्षिण सोलापुरात एकही रुग्ण आज आढळला नाही.
सध्या अक्कलकोट तालुक्यातील 17, बार्शीतील 169, करमाळ्यातील 119, माढ्यातील 146, माळशिरसमधील 184, मंगळवेढ्यातील 34, मोहोळमधील 89, उत्तर सोलापुरातील 16, पंढरपुरातील 535, सांगोल्यातील 101 आणि दक्षिण सोलापुरातील 11 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
आज माळशिरसमधील मांडवे येथील 62 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्यातील वैरागमधील 72 वर्षीय पुरुष, मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील 60 वर्षीय पुरुषाचा आणि माढा तालुक्यातील टेंभूर्णीतील 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृत पावलेले सर्व रुग्ण 2 डिसेंबरनंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते.
ग्रामीणमधील तीन लाख 44 हजार 159 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
आतापर्यंत 11 तालुक्यांत आढळले 36 हजार 430 कोरोना पॉझिटिव्ह
आज दोन हजार 385 संशयितांमध्ये आढळले 84 बाधित; चौघांचा मृत्यू
रुग्णांच्या संपर्कातील 11 हजार 938 संशयित होम क्वारंटाईन तर दोन हजार 823 इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज