टीम मंगळवेढा टाईम्स ।
टी-20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना (T20 World Cup 2024 Final) शनिवारी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ (IND vs SA) यांच्यात खेळला गेला.
या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर कब्जा केला आहे.
टीम इंडियाने या विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आणि संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिली. भारतीय संघांच्या शानदार विजयानंतर टीम इंडिया मालामाल होणार आहे.
नुकताच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाला 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केला आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ते म्हणाले, “आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2024 जिंकल्याबद्दल टीम इंडियासाठी INR 125 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करताना मला आनंद होत आहे.
संपूर्ण स्पर्धेत संघाने अपवादात्मक प्रतिभा, दृढनिश्चय आणि खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे अभिनंदन!”
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज