मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी २० व २१ जून रोजी प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. दोन दिवसांत जिल्ह्यातील १०९ गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येणार असून, त्यात हे आरक्षण ठरणार आहे.
जानेवारी ते डिसेंबर २०२३ दरम्यान मुदत संपणाऱ्या १०९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी हे आरक्षण काढण्यात येणार आहे. मुदत संपणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी गावपातळीवर नव्याने प्रभाग रचना करण्यात येत आहे.
प्रभाग रचनेचा वाद व अन्य गोष्टी टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचना व प्रभागातील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
ग्रामसभेच्या ठरावादरम्यान झालेल्या आरक्षणाचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून जिल्हाधिकारी व आहेत. उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांच्याकडे मान्यतेसाठी येणार आहे.
२३ जूनला आरक्षणाला मान्यता देण्यात येणार आहे. २६ जूनला ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीला प्रारूप प्रसिद्धी देण्यात येणार आहे. २७ जूनपासून आरक्षणावर हरकती व सूचना मागविल्या जाणार आहेत.
७ जुलैला उपविभागीय अधिकारी हरकतीवर अभिप्राय देणार आहेत. १२ जुलैपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडून आलेल्या अभिप्रायांचे अवलोकन करून जिल्हाधिकारी या अधिसूचनेला अंतिम मंजुरी देणार १४ जुलै १०९ ग्रामपंचायतींमधील आरक्षण सोडतीला अंतिम मान्यता मिळणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज