टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील ३ गावात लांडग्याने जीवघेणा हल्ला केल्याने अंदाजे १० जण गंभीर आहेत. तसेच जनावंरावर व काही कुत्र्यावर ही हल्ला केल्याचे समजते. सलगर खुर्द, बावची माळवाडी,पौट (ता. मंगळवेढा ) या गावात शनिवारी रात्री १२ ते पहाटे २ च्या दरम्यान लांडग्याने हल्ला केल्याचे समजते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सलगर खुर्द मधील तुकाराम खडतरे( वय ६८ ), जयहिंद तुकाराम खडतरे (४o), अक्षय जयहिंद खडतरे (वय १३), संगिता जयहिंद खडतरे (वय ३२)यांच्यावर रात्री एक वाजता लांडग्याने प्राणघातक हल्ला केला.
खडतरे कुटुंब बाहेर व्हरांड्यात झोपलेले असताना कुटुंबातील चौघांवर जीवघेणा हल्ला झाला. त्यानंतर जोरजोरात किंचाळण्याच्या आवाजाने लोक जमा झाले हुसकताना लांडगा ठार झाला.
बावची येथील अनिता बसवराज माळी, (वय ३८) पारूबाई इरांना माळी ( वय ४०), यशराज राजू फोंडे( वय १२), सुखदेव सिध्दू जाधव ( वय ६५), तानाजी श्रीरंग चव्हाण ( वय ४२ ), भारत विठोबा म्हमाणे ( वय ४५)(रा.पौट) अशी जखमींची नावे आहेत. गंभीर जखमी असणाऱ्यांना सोलापूरला नेण्यात आले आहे.
तसेच घटनेची माहिती पोलीस पाटील आणि सरपंच यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याला दिली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देवून जखमींना उपचारासाठी सोलापूरमध्ये दाखल करण्यासाठी रवाना केले. घटनास्थळी वनखात्याचे अधिकरी दाखल होऊन पुढील कारवाई करत आहेत.
तसेच या हल्ल्यात दोन कुत्रे, एक गाय व म्हैस यांनाही चावले आहे. सदर लांडगा पिसाळलेला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. सायं ४ ते रात्री १ वाजेपर्यंत हा थरार चालू होता .त्यामुळे बावची परिसरातील सर्व नागरिकांनी संपूर्ण रात्र जागून काढली.
या परिसरात वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे याकडे लक्ष नसल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
बावचीचे पोलीस पाटील महावीर भोसले यांनी ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना घेवून रात्री पोलीसांशी संपर्क साधून ही बाबमी कळविली व घटनास्थळी भेट दिली . सरपंच मिननाथ चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष भिमराव येडवे यांनी रात्री सर्वांशी फोनवरून संपर्क करून सावध राहून घाबरून न जाण्याचे आवाहन केले.
बावची येथील वनक्षेत्रात अनेक वन्यजीव वास करतात परंतु कोणतेही कुंपण नसल्याने त्यांच्या वावरास प्रतिबंध करता येत नाही . रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या अधिकाऱ्याशी संपर्क होवू शकला नाही . याबाबत सर्व नागरिकांत नाराजी आहे . जखमी झालेल्यांना त्वरीत भरपाई मिळावी म्हणून नातेवाईकांची मागणी आहे . हुलजंती बीटचे हवालदार श्री सलगर यांनी लगेच बावची येथे घटनास्थळी भेट दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज