मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
ऑक्टोबर महिन्यामध्ये सतत पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या मंगळवेढा तालुक्यातील २६ गावच्या २३६६ खातेदारांना १ कोटी ९१ लाख ८२ हजार २५५ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली असून, केवायसी केल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याची माहिती आ. समाधान आवताडे यांनी दिली.
ऑक्टोबर २०२२ मध्ये सतत पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांची पिके वाया गेली होती. अनेक ठिकाणी शेतीला पाणी लागून शेतातून दोन-दोन महिने पाणी वाहात होते. मात्र प्रशासनाकडून पहिल्यांदा ज्या मंडलमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे, अशाच मंडलचे अतिवृष्टीच्या नावाखाली पंचनामे केले होते.
मात्र तालुक्यातील सर्वच भागात सततचा संततधार पाऊस पडून जमिनींना पाणी लागले होते. त्यामुळे आमदार समाधान आवताडे यांनी संबंधित मंत्री व पालकमंत्री यांना तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.
आमदार आवताडे यांच्या आदेशाप्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील नुकसानग्रस्त झालेल्या जिरायत, बागायत, फळबागांचे पंचनामे करून त्यावेळी प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकसानीचा आकडेवारीसह अहवाल पाठविला होता.
पण तालुक्यातील आंधळगाव व भोसे या दोनच मंडलमध्ये ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे दाखवत या दोन मंडलमधील शेतकऱ्यांना मदत मंजूर झाली आहे. बाकीच्या सहा मंडलमध्येही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून शेतीचे नुकसान झाले होते. यामध्ये १२८६.५ हेक्टरवरील पिके बाधित झाली होती. अनेक ठिकाणी शेतात पाणी लागून फळबाग व इतर पिकांचे नुकसान झाले होते.
मात्र, आंधळगाव भोसे मंडल वगळता इतर कोणत्याही मंडलमधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, आमदार आवताडे यांच्या सततच्या पाठपुराव्याने ही मदत जाहीर झाली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज