टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतामध्ये खर्च करूनही कोणतेच उत्पन्न मिळत नाही, या नैराश्येतून येथील एका २८ वर्षीय युवा शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली ही घटना दुपारी साडेतीनच्या दरम्यान मोहोळ येथे उघडकीस आली.
मनोज राजाराम गायकवाड असे या आत्महत्या केलेल्या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. मोहोळ येथील नरखेड रस्त्यावरील गायकवाड वस्ती येथे मनोज गायकवाड हा त्याचे वडील व आजीसमवेत राहत होता. त्यांना पाऊण एकर शेत आहे.
त्या शेतात खर्च करूनही त्याला उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे तो आर्थिक तणावात असायचा. त्या नैराश्येतून त्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळ्यातील टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही माहिती कुटुंबियांना मिळाल्यानंतर तत्काळ पोलिसांना खबर देण्यात आली. येथील वस्ती याबाबत मृताचे चुलते दयाराम पांडुरंग गायकवाड यांनी मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली आहे.
यानुसार मोहोळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार माने हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज