टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात कारणावरून फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी योगेश मोहन ताटे (रा.घरनिकी ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील अल्पवयीन मुलीचे कुटुंब दि.१७ रोजी रात्री ९ .०० वा. जेवण करून घरात बसले असताना यातील अल्पवयीन मुलगी जेवण करून घराबाहेर आली.
बराच वेळ घरात न आल्याने कुटुंबीयांनी तीचा मंगळवेढा व पंढरपूर तसेच अन्य ठिकाणी सर्वत्र शोध घेतला.मात्र ती मिळून आली नाही.
यातील आरोपी योगेश मोहन ताटे हा ही गावात नसल्याने कुटुंबियाना त्याचा संशय येवून खात्री पटल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने त्याच्याविरूध्द कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली आहे.
ती मुलगी अंगाने सडपातळ, रंगाने गोरी, अंगात नेसणेस लाल रंगाचा टॉप, काळी जीन्स अशा वर्णनाची असून कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तपासिक अंमलदार सुरज हेबाडे यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज