टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे
केवळ शेतकरी जातीच्या अस्तित्वामुळे आपला भारत देश कृषीप्रधान राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात आपला लौकिक अबाधित ठेवून आहे. लाखाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्वांगीण परिवर्तनासाठी
नामवंत उद्योगपती जनार्धन शिवशरण यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वातून मागील २७ वर्षांपासून उभे असलेले फार्मर मॉल खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या उत्कर्ष समृद्धीचे माहेरघर असल्याचे गौरवोद्गगार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले आहे.
फार्मर मॉल यांच्यावतीने आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण व रील्स स्पर्धा पारितोषिक वितरण आमदार आवताडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिनोलेक्स पाईप सॅंड फिटिंग ॲग्री नॅशनल हेड विश्वजीत मुरलीधर हारूगडे हे होते.
कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना ॲग्री कॉस्ट एक्स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड चे सर्वेसर्वा अजय अदाटे यांनी मांडली तर या सुचनेसाठी युवा उद्योजक निलेश साबळे यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाप्रसंगी तब्बल 22 प्रेरणादायी शेतकऱ्यांना फार्मर मॉल आदर्श शेतकरी पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक करताना उद्योगपती जनार्धन शिवशरण यांनी सांगितले की, गेल्या 27 वर्षांमध्ये आदित्य ईरिगेटर्स ते फार्मर मॉल असा संघर्ष शैली पण तितकाच प्रेरणादायी प्रवास करत असताना या भागातील शेतकरी बंधू-भगिनींनी आमच्या व्यवसायिक कल्पकतेवर तितकाच विश्वास ठेवून वेळोवेळी आम्हाला प्रोत्साहित केल्यामुळे फार्मर मॉल सारखे अद्यावत साम्राज्य उभा करण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो आहे.
त्यामुळे आजच्या कर्तुत्वाचे व यशाचे सगळं श्रेय केवळ माझ्या शेतकरी बंधू-भगिनींना असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद करून यापुढील काळामध्ये या शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आपण आणखी जोमाने उद्योजकीय सेवा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रयोगशील शेतकरी बालाजी लोहकरे यांनी आपल्या तंत्रज्ञान युक्त शेतीच्या माध्यमातून साधलेली आर्थिक प्रगती व बाजारपेठेतील पीक उत्पादनाचे कौशल्य आत्मसात करण्याची हातोटी नेमकी कशी असावी याबद्दल उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना समर्पक आणि सखोल मार्गदर्शन करत फार्मर मॉल च्या यशोगाथेचा संपूर्ण प्रवास मांडत शिवशरण परिवाराचे विशेष कौतुक केले.
पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यानंतर शेतकरी खऱ्या अर्थाने सर्वव्यापी प्रगती साधू शकेल असेही त्यांनी मार्गदर्शन करत असताना सांगितले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील उपसंचालक संशोधन व विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना प्रादेशिक आणि भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन आपण आपली शेती आणि काळ्या मातीची सेवा करण्यासाठी फार्मर मॉल च्या माध्यमातून मार्गदर्शनाची पालखी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे तरच आपल्याला आपल्या शेतीमध्ये अपेक्षित बदल आणि विकास करता येईल याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर ऊस व्यवस्थापन या विषयावर रावसाहेब दरगडे यांनीही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती नमूद करत असताना नगदी पीक म्हणून उसाकडे पाहत असताना ऊस उत्पादनाच्या वाढीव उताऱ्यासाठी आपण नेमकी कोणती पद्धत अवलंबली पाहिजे यावर त्यांनी भाष्य केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वजीत हारुगडे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत यांनी फार्मर मॉल आणि फिनोलेक्स यांचे व्यावसायिक दृष्टिकोनाच्या पलीकडे असलेले संवेदनशील नाते किती घट्ट आणि विश्वासाच्या याबद्दल आपल्या भावना व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा फार्मर मॉल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना फिनोलेक्स कंपनीच्या विविध शेतीपूरक नॉन ॲग्री साधनसामग्रीचा पाठपुरावा करत असताना शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्यांचे हित जपण्याच्या अनुषंगानेच सर्व बाबी केल्या जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
या कार्यक्रमाच्या वेळी घेण्यात आलेल्या रील स्पर्धेतील पहिल्या पाच विजेत्यांना रोख रक्कम व सत्कार साहित्य रूपाने सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर तब्बल वीस स्पर्धकांना उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून रोख रक्कम व सत्कार साहित्य देऊन त्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप बिनवडे व संतोष मिसाळ यांनी केले तर सर्वात शेवटी फार्मर मॉल मुख्य कार्यकारी अधिकारी करुणा शिवशरण यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमासाठी राज्यातील विविध भागातून अनेक सत्कारमूर्ती पंचक्रोशीतील शेतकरी बंधू भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फार्मर मॉल शाखा बेगमपूर व मरवडे येथील सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज