मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
पोलिस दलात मुलांच्या बरोबरीने मुली उत्तमप्रकारे कार्यरत असून, भारतीय सैन्य दलातही महिला यशस्वी होत असताना
राज्य राखीव पोलिस दलातील भरती प्रक्रियेत मुलींना संधी दिली जात नसल्याचा प्रश्न आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना राज्याच्या गृह विभागाने महिलांना राज्य राखीव पोलिस दलात संधी देण्याचा निर्णय घेतला असून,
नागपूर येथील राज्य राखीव पोलिस दलात महिलांचा गट/कंपनी निर्माण करण्यास व त्याकरिता १४४ नवीन नियमित पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महिलांना पोलिस दलात सहभागी करून घेण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.
एकापेक्षा ज्यादा अर्ज भरण्याची संधी मिळावी
मोहिते-पाटील यांनी पोलिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास संधी देण्याची मागणी केली.
यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भरती प्रक्रियेसाठी मैदानी चाचणीला वेळ लागत असून, उमेदवाराला एकच घटकात अर्ज करण्याचा पर्याय दिल्याने भरती प्रक्रिया सुनियोजित व विहित वेळेत पूर्ण करणे शक्य होत असल्याचे सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज