mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वाजवा तुतारी! जनतेच्या पाठींब्यावर ४ जूनला गुलाल आपलाच; महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना विश्वास

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 6, 2024
in सोलापूर
वाजवा तुतारी! जनतेच्या पाठींब्यावर ४ जूनला गुलाल आपलाच; महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील यांना विश्वास

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार साहेब व विजयदादा यांनी टाकलेला विश्वास, माढा लोकसभा मतदार संघातील जनतेने दिलेल्या पाठींब्याच्या जोरावर ४ जूनला गुलाल आपलाच उधळला जाईल असा विश्वास माढा लोकसभा म तदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभा म तदारसंघाच्या झंझावती प्रचार दौ-याची आज उत्साहात सांगता करण्यात आली बोलताना मोहिते पाटील यावेळी म्हणाले नेते कुठेही असू द्यात, जनता आमच्या पाठीशी आहे गेल्या पंधरा दिवसात विजयदादा व बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभा मतदार संघातील ८३५ गावांचा आपण झंझवती प्रचार दौरा केला.

महाविकास आघाडील नेत्यांनी प्रचाराची बाजु संभाळली. त्यांच्या प्रचार सभांना जनतेने उत्स्फुर्त पाठिंबा दिला व या सभा यशस्वी केल्या. जनतेनेच ही निवडणुक हातात घेतल्याने आमचा विजय निश्चित आहे.

२०१९ ला पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील सहा जिल्हे व ३१ दुष्काळी तालुक्यातील शेतीला कृष्णा – भीमा स्थिरीकरणाच्या माध्यमातून पाणी मिळावे यासाठी आम्ही भाजपात प्रवेश केला.

यामध्ये आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नव्हता. पक्षाने लोकसभेला दिलेल्या उमेदवाराला एक लाख १६ हजार मतांचे मताधिक्य देवून विजयी केले. अटीतटीच्या लढतीत एका रात्रीत नवख्या सातपुतेंना आमदार केले.

जिल्हा परिषदेत भाजपाची सत्ता आणली. तीन नगरपालिका व माळशिरस पंचायत समितीत भाजपाची सत्ता आणली. तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते. ज्यांना खासदार म्हणून आम्ही निवडून दिले त्यांना त्यांच्या तालुक्यात एक ग्रामपंचायत सुध्दा आणता आली नाही आणि माढा लोकसभेतील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी साधा उमेदवारही मिळाला नाही .

तरीही ते निष्ठावंत ? वारे न्याय अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. ना देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी आमच्या मनात कोणताही राग अथवा द्वेश नाही पण खा नाईक निंबाळकर, आ जयकुमार गोरे व आ श्रीकांत भारतीय यांनी आमच्या विषयी चुकीची माहिती देवून नेतृत्वाचे कान भरले हे चुकीचे आहे. काल पर्यंत आम्ही चांगले होतो पक्ष सोडला की

गुंड झालो काय ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीरा – देवधर धरणाविषयी बोलताना मोहिते पाटील म्हणाले, या धरणासाठी विजयदादा व रामराजेंनी १९८४ पासून प्रयत्न केले. जमिनीचे अधिग्रहण करुन घेतले. मध्यंतरी १५ २० वर्षे विदर्भाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यपाल महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातील योजनांना स्टे दिला. त्यामुळे निधी मिळाला नाही म्हणून ही योजना रखडली.

आता हा स्टे उठला आहे. नीधी आला आहे. त्यामुळे नीरा – देवधर योजना सुरु झाली. पवार साहेब, विजयदादा, रामराजे यांनी कधी श्रेयासाठी काम केले नाही. परंतु अलिकडे काम न करता पाणीदार, जलनायक अशा बिरुदावली लावून फिरणारे वाढले आहेत असे म्हणत खासदार नाईक निंबाळकर व आ गोरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली .

लोणंद – पंढरपूर रेल्वेचा प्रश्न सोडविला म्हणणा-या खासदारांनी पुणे – फलटण रेल्वेच्या गेटवर साधा गेटमन नेमला नाही . रेल्वेचा ड्रायव्हरच गेट उघडतो व बंद करतो अशी सध्या शोकांतीका आहे असे सांगून केंद्राच्या अनेक योजना आहेत. त्यातीलच एक अंध – अपंग लोकांसाठी योजना होती. आपण माळशिरस तालुक्यात १०० टक्के ती यशस्वी केली. लोकांना लाभ मिळवून दिला. परंतु सातारा जिल्ह्यात खासदारांना योजनाच माहित झाली नाही. प्रशासनाने ती राबविल्यावर यांना कळले .

हे आज खालच्या पातळीवर जावून आमच्यावर टीका करतात . आम्हालाही जशास तसे उत्तर देता येते. परंतु आमच्या घरावर सहकार महर्षीचे संस्कार आहेत. पवार साहेब व विजयदादांनी सांगितले आहे की आपण पातळी सोडून बोलायचे नाही म्हणून आम्ही गप्प आहे .

जनता आता दुधखुळी राहिली नाही. येत्या सात तारखेला मतदानाच्या म ाध्यमातून ती माढा लोकसभेत नक्कीच परिवर्तन घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभेतील शेती व शेतक-यांच्या शेतीला पाणी युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी प्रत्येक तालुक्यात मिनी एम .आय.डी.सी., केळी संशोधन केंद्र, किसान रेल्वे आदी प्रश्नाबाबत आपण सतर्क राहून काम करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धैर्यशील मोहिते पाटील

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
मंगळवेढ्यात स्वस्तात प्लॉट खरेदी करा; सोबत लकी ड्रॉ, कार जिंकण्याची संधी; 47 प्लॉट 47 बक्षिसे; आजच संपर्क साधा 9823533526, 9860351555 व 9860016060

मंगळवेढ्यात स्वस्तात प्लॉट खरेदी करा; सोबत लकी ड्रॉ, कार जिंकण्याची संधी; 47 प्लॉट 47 बक्षिसे; आजच संपर्क साधा 9823533526, 9860351555 व 9860016060

ताज्या बातम्या

दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी खळबळ! सुटे मसाले विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; दुकानदारांचं टेन्शन वाढलं

October 16, 2026
मंगळवेढयातील मुला-मुलींसाठी नोकरीची संधी; ‘या’ दुकानात सेल्समन पदासाठी होणार आहे मोठी भरती

तरुणांसाठी मोठी संधी! मंगळवेढ्यातील नामांकित ‘अर्जुन पीव्हीसी पाईप’ कंपनीत तातडीने भरती सुरु; दररोज मिळणार आकर्षक वेतन व सुविधा; आजच 9673635511 संपर्क साधा

October 15, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शिक्षण क्षेत्रात खळबळ! खासगी शिक्षण संस्थांचा काळाबाजार; विद्यार्थी खरेदी विक्रीचा महाघोटाळा उघड

October 15, 2026
तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

सहकारी बँकांमध्ये दहा वर्षे तळ ठोकलेले बँक संचालक अपात्रच; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय : ‘हे’ दिग्गज येणार अडचणीत

October 15, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा