टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. सध्या पक्षातील उमेदवार व अपक्ष यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

नगरपालिका बचाव आघाडीच्या माध्यमातून तिसरी आघाडी स्थापन होणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

शहरातील प्रस्थापितांना टक्कर देण्यासाठी ही तिसरी आघाडी तयार होणार असल्याचे बोलले जात असून यावर सध्या युद्धपातळीवर गोपनीय बैठका सुरू झाल्या आहेत.

मंगळवेढा शहराचा विकास कोणत्या प्रकारे झाला आहे, कोणते प्रश्न प्रलंबित आहेत? यासारख्या बारीक सारखी गोष्टीकडे लक्ष वेधून प्रत्येक प्रभागात घर टू घर प्रचार यंत्रणा उभी करण्यात येत आहे.

अपक्ष उमेदवारांनी रणनीतींमध्ये बदल करण्यास सुरुवात केली असून, निष्ठावंत कार्यकर्ते यांच्या गाठीभेटी देखील सुरू केले आहेत. गोपनीय संपर्क मोहिमा गतीमान केल्या आहेत.
सध्या नगराध्यक्ष पदाची निवड थेट जनतेकडून होत असल्याने, प्रत्येक मताचे मोल अधिक वाढले आहे. नाराज निष्ठावंत कार्यकर्ते नाराज झाले आहेत, याचा परिणाम थेट नगरसेवक आणि नगराध्यक्ष या दोन्ही निवडणुकांवर होऊ शकतो.

नगरपालिका बचाव आघाडी ही तिसरी आघाडी जर स्थापन झाली तर याचा फटका शेवटी कोणत्या पक्षाला बसतो आणि कोणाचे राजकीय गणित कोसळते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












