मंगळवेढा टाईम्स न्युज ।
शेगाव (ता.अक्कलकोट) येथे शेतकरी सुरेश गणपती बिराजदार (वय ४८) यांनी स्वतःच्या शेतात झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. वर्षभरापूर्वी त्यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

या दोन्ही घटनांमुळे बिराजदार कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. संपूर्ण शेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरेश बिराजदार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच गावातील सुरेश गड्डी, सुरेश झळके, वीरप्पा बिराजदार, बाबुशा करपे, सिद्धप्पा टाकळे, अंबादास गड्डी व शिवशरण बिराजदार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

त्यांनी सुरेश यांना उपचारासाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. आलट यांनी बिराजदार यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुनील कटारे यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. डॉ. अविनाश करजखेडे व वैद्यकीय अधिकारी अशोक राठोड यांच्याशी संपर्क साधला.

या घटनेची नोंद करजगी पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस हवालदार शिवानंद भोसले व गजानन शिंदे हे पुढील तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यास दोन मुले असून, ती अनुक्रमे दहावी व अकरावी इयत्तेत शिक्षण घेत आहेत. आई-वडील दोघांनाही गमावल्याने या दोन मुलांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














